IMPIMP

Video : जालन्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

by bali123
police beat bjp yuva morchas activist video goes viral

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन एका खासगी रूग्णालयात झालेल्या वादाचे व्हिडिओ शुटिंग केल्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी police बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाणीची घटना 9 एप्रिल रोजी घडली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे. तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून अमानुष मारहाणीबद्दल संताप व्यक्त केला आहे. कोरोना महामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत लोकांचे खुन होताहेत तिथे दाखवा खाकीचा जाेर… गोरगरीबांवर जोर काढून काय साध्य करताय असा सवाल त्यांनी पोलीस police प्रशासनाला केला आहे. यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून, तो माणूस कुणीही असो, त्याने जर चुकीचे केले असेल तर गुन्हा दाखल करा. पण या पद्धतीने गुरांसारखे मारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे म्हटले आहे.

शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कदीम जालना पोलीस police ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन म्हणाले की, 9 एप्रिल रोजी एका खासगी रूग्णालयात अपघात झालेल्या व्यक्ती मरण पावला होता. त्यानंतर काही तरूणांनी येऊन रूग्णालयाची तोडफोड केली होती. जमाव पागविण्यासाठी आम्ही लाठीचार्ज केला होता. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन लाखांची लाच घेणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर दिसत आहे. शिवाय, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व कर्मचारी दिसत आहेत.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts