IMPIMP

Police Personnel Suspended | …म्हणून पुणे शहर पोलिस दलातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

by nagesh
Pune Crime News | A policeman who attempted 'recovery' near 'Dagdusheth' on Sankashti Chaturthi has been suspended

पुणे :   सरकारसत्ता ऑनलाइन – Police Personnel Suspended | मोक्का कायद्यांतर्गत (MCOCA) Mokka ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेल्या हिंदू राष्ट्र सेना पदाधिकारी (Hindu Rashtra Sena) तुषार हंबीर (Tushar Hambir) याच्यावर चौघा जणांनी हल्ला (Pune Crime) केला होता. यावेळी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या चौघांपैकी तिघे चक्क घटनास्थळी अनुपस्थितीत होते. त्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil) यांनी निलंबित (Police Personnel Suspended) केले आहे. (Pune Police)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलीस नाईक पांडुरंग भगवान कदम (Police Naik Pandurang Bhagwan Kadam), पोलीस शिपाई राहुल नंदु माळी (Constable Rahul Nandu Mali) आणि सिताराम अहिलु कोकाटे (Sitaram Ahilu Kokate) अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची (Police Personnel Suspended) नावे आहेत. हे सर्व जण पोलीस मुख्यालयातील (Pune Police Headquarters) कोर्ट कंपनीमध्ये नेमणुकीला होते.

 

मोक्का कायद्यांतर्गत येरवडा कारागृहात (Yerawada Jail) तुषार हंबीर असताना त्याच्यावर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयातील इन्फोसिस जनरल वॉर्डमध्ये (Infosys General Ward) 25 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.
त्याच्यावर उपचार सुरू असताना कोर्ट कंपनीतील (Court Company) चौघांची बंदोबस्तावर नेमणूक करण्यात आली होती. 5 सप्टेबर रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान चौघांनी वॉर्डमध्ये शिरुन हंबीर याच्यावर गोळी (Firing) झाडली.
परंतु ती उडली नाही. तेव्हा त्यांनी कोयता, तलवारीने हंबीरवर हल्ला केला.
तेव्हा बंदोबस्तावर नेमलेल्या चौघांपैकी केवळ एक पोलीस कर्मचारी होता.
त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले होते.
मात्र, त्यावेळी ड्युटीवर नेमणूक असतानाही तिघे जण घटनास्थळी अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
त्यामुळे तिघाही पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केले आहे.

 

 

Web Title :- Police Personnel Suspended | Three police personnel suspended pune police

 

हे देखील वाचा :

Pune Rural Police | डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा पुण्यात मृत्यू, दहा दिवसांचे बाळ झालं पोरकं

Pune Crime | बेकायदेशीर सावकारी ! 6 लाखाचे 17 लाख दिले तरी आणखी 30 लाखाची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

Congress Ashok Chavan | अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेत्यांची मागणी

 

Related Posts