IMPIMP

Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !

by nagesh
Post Office | lakhs of rupees deposited in sukanya samriddhi yojana disappeared from the post office

नवी दिल्ली : वृत्त संस्था Post Office | पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही दरमहा एक छोटी रक्कम जमा करून चांगले रिटर्न मिळवू शकता. अशीच एक योजना आहे ज्याच्यामध्ये 1000 रूपये जमा करून दरमहा 4950 रुपये मिळवू शकता. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस (Post Office) मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेत तुमचे पैसे संपूर्ण गॅरंटीसह व्याजासह परत मिळू शकतात. या योजनेची सविस्तर माहिती घेवूयात…

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

जॉईंट खात्यात 9 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची संधी

ही योजना त्यांच्यासाठी चांगली आहे ज्यांना वन टाइम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रेग्यूलर इन्कम हवे आहे. या योजनेंतर्गत एक व्यक्ती 4.5 लाख रुपयांपर्यंत वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकते. मात्र, जॉईंट खात्यांतर्गत हे लिमिट 9 लाख रुपयांचे होते. जॉईंट खाते पती, पत्नी एकत्र उघडू शकतात.

 

 

अशी होईल दर महिन्याला 5 हजार कमाई

सध्या पोस्ट ऑफिस (Post Office) मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याजदर मिळतो. याचा अर्थ आहे की, त्या व्यक्तीस वार्षिक 29,700 रुपयांचा लाभ होईल. मात्र, जॉईंट खाते उघडणे आणि 9 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हे रिटर्न दुप्पट होऊन 59,400 रुपये होईल. जर आपण हे 12 महिन्यात विभागले तर प्रत्येक महिन्याला रिटर्नम्हणून 4,950 रुपये मिळू शकतात. जर आपण रिटर्न विड्रॉ केले नाही आणि वार्षिक 59,400 रुपये व्याजाची रक्कम खात्यात ठेवून दिली, तर यावर सुद्धा जास्त व्याज मिळू शकते.

 

 

इन्व्हेस्टर्स या रक्कमेवर व्याज प्राप्त करतील आणि त्यांना कम्पाऊंडिंगचा लाभ मिळू शकतो. अशाप्रकारे 6.6 टक्के दराने 59,400 रुपयांवर सुद्धा तुम्हाला वार्षिक 3,920.40 रुपयांचे व्याज मिळेल. पुढील दोन वर्षात 9 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट वाढवून 9,63,320.40 रुपये होईल.

 

 

हे उघडू शकतात खाते

तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने सुद्धा खाते उघडू शकात.
जर मुलगा 10 वर्षांचा असेल तर त्याच्या नावावर, त्याचे आई-वडील खाते उघडू शकतात.
मुलगा प्रौढ झाल्यानंतर त्याला खात्याची जबाबदारी मिळू शकते.

 

 

असे उघडा खाते

तुम्ही तुमच्या सुविधानुसार कोणत्याही पोस्ट खात्यात जाऊन खाते उघडू शकता.
यासाठी आधार कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, रेशन कार्ड,
ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एकाची फोटो कॉपी जमा करावी लागेल.
याशिवाय अ‍ॅड्रेस प्रूफ जमा करावा लागेल, ज्यामध्ये ओळखपत्र सुद्धा उपयोगी पडू शकते.
याशिवाय 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ जमा करावे लागतील.

 

 

Web Title :  post office monthly income scheme just deposit rs 1000 and get rs 4950 month

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

Gold Price Today | सोन्याचा दर वाढून 46,753 रुपयांवर पोहचला, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts