IMPIMP

Gold Price Today | सोन्याचा दर वाढून 46,753 रुपयांवर पोहचला, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold price today gold rise to rupees 46753 per 10 gram 26 july 2021 check latest rates investment and return

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 26 जुलै 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) तेजीचा कल होता. यामुळे सोने 46,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे जाऊन बंद झाले. तर, चांदीच्या किंमतीत सुद्धा उसळी (Gold Price Today) नोंदली गेली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागील व्यवहाराच्या सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने 46,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले
होते. तर, चांदी 65,684 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज तेजी नोंदली गेली, तर चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही.

 

 

सोन्याची नवीन किंमत

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात 169 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली. राजधानी
दिल्लीत (Delhi) 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन भाव आज 46,753 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढून 1,808 डॉलर प्रति औंसवर पोहचली. डॉलरच्या तुलनेत 4 पैशांची घट झाली आणि सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान भारतीय चलन 74.44 च्या स्तरावर पोहचले.

 

चांदीचा नवीन भाव

चांदीच्या किंमतीत सुद्धा आज तेजी दिसून आली.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचे दर 396 रुपयांच्या वाढीसह 66,080 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला
नाही आणि ती 25.32 डॉलर प्रति औंसवर पोहचली

 

 

सोन्याच्या किंमतीत का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण आणि अमेरिकन बाँडच्या यील्डमधील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदली गेली.

 

 

Web Title :- Gold Price Today | gold price today gold rise to rupees 46753 per 10 gram 26 july 2021 check latest rates investment and return

 

हे देखील वाचा :

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’

Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंट बोर्डाचा माजी नगरसेवक विवेक यादवनं सीम कार्ड दिली वाशीच्या खाडीत फेकून, पोलीस कोठडीत वाढ

Maharashtra Flood | पूरग्रस्त भागात मृत्यूतांडव ! 164 जणांचा मृत्यू, 25 हजार 564 जनावरं दगावली

 

Related Posts