IMPIMP

Post Office Schemes Provide Loan | पोस्ट ऑफिसच्या कोण-कोणत्या योजनांवर मिळते कर्जाची सुविधा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

by nagesh
 Post Office Schemes 2023 | savings top 5 best small saving post office schemes 2023 interest rate tax benefits and maturity all you need to know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पोस्ट ऑफिसच्या काही अल्प बचत योजना कर्जाची (Post Office Schemes Provide Loan) सुद्धा सुविधा देतात. या योजनांमध्ये ही सुविधा घेण्यासाठी वेगवेगळे पात्रता निकष आहेत. जे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ही सुविधा दिली जाते. जर तुम्हीसुद्धा पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत (post office schemes) गुंतवणूक केली असेल आणि सणाच्या काळात तुम्हाला पैशांची गरज असेल तर या सुविधेचा सहज लाभ घेऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या कोण-कोणत्या योजनेत कर्जाची सुविधा मिळत आहे (Loan facility on post office schemes) ते जाणून घेवूयात…

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

PPF मध्ये अशाप्रकारे घेऊ शकता कर्ज सुविधा

– त्या आर्थिक वर्षाच्या अखेरपासून एक वर्ष झाल्यानंतर कर्ज घेता येऊ शकते ज्यामध्ये प्रारंभिक सदस्यत्व घेतले होते (म्हणजे 2019-20 च्या दरम्यान खाते उघडले, कर्ज 2020-21 मध्ये घेता येते).

– त्या वर्षाच्या शेवटपासून पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कर्ज घेता येऊ शकते ज्यामध्ये प्रारंभिक सदस्यत्व घेण्यात आले होते.

– ज्यावर्षी कर्ज लागू करण्यात आले, त्याच्या अगदी अगोदरच्या दुसर्‍या वर्षाच्या शेवटी त्याच्या क्रेडिटमध्ये शिल्लक रक्कमेच्या 25 टक्केपर्यंत कर्ज घेता येऊ शकते. (म्हणजे जर 2019-20 च्या दरम्यान घेतलेले कर्ज, 31.03.2018 ला शिल्लक कर्जाच्या 25 टक्के)

– एका आर्थिक वर्षात केवळ एकच कर्ज घेता येऊ शकते.

– दुसरे कर्ज तोपर्यंत दिले जाणार नाही, जोपर्यंत पहिले कर्ज फेडले जात नाही.

– जर घेतलेले कर्ज 36 महिन्यांच्या आत फेडले तर, तर कर्जावर व्याजदर 1 टक्का प्रति वर्ष लागू होईल.

– जर कर्ज 36 महिन्यानंतर फेडले तर कर्जावर व्याज 6 टक्केच्या दराने लागू होईल. हे व्याज त्या दिवसापासून लागू होईल ज्यादिवशी कर्ज दिले होते.

 

पोस्ट ऑफिसच्या RD वर कर्जाच्या अटी

– 12 हप्ते जमा झाल्यानंतर आणि 1 वर्षापर्यंत खाते सुरू ठेवल्यानंतर डिपॉझिटर्स अकाऊंटमध्ये जमा शिल्लक रकमेच्या 50 टक्केपर्यंत कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतो.

– कर्ज एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यात फेडता येऊ शकते.

– कर्जावर व्याज आरडी खात्यावर लागू 2 टक्के + आरडी व्याजदराच्या रूपात लागू होईल.

– व्याजाची गणना कर्ज काढल्याच्या तारखेपासून परतफेडीच्या तारखेपर्यंत केली जाईल.

– जर मॅच्युरिटीपर्यंत कर्जाची परतफेड केली गेली नाही तर कर्ज आणि व्याज आरडी अकाऊंटच्या मॅच्युअर्ड रक्कमेतून कापून घेतली जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कोणत्या योजनेत नाही कर्जाची सुविधी

पोस्ट ऑफिसच्या अनेक लोकप्रिय अल्प बचत योजना आहेत. परंतु काही योजनांमध्ये कर्जाची सुविधा नाही. यामध्ये टाइम डिपॉझिट स्कीम, मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या योजना, किसान विकासपत्र यांचा समावेश आहे. या सर्व योजनांमध्ये रिटर्न चांगले मिळते, पण कर्जाची जी सुविधा पीपीएफ आणि आरडी अकाऊंट होल्डर्ससाठी आहे ती इतर योजनांमध्ये नाही. (Post Office Schemes Provide Loan)

 

Web Title : Post Office Schemes Provide Loan | in which post office schemes provide loan facility know what is the complete process

 

हे देखील वाचा :

Amarinder Singh | कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?, भाजप नेत्याचा दावा

PF Amount Transfer | नोकरी बदलल्यानंतर घरबसल्या ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF, जाणून घ्या एकदम सोपी ऑनलाइन प्रक्रिया

Pune Court | 2.40 कोटीचे फसवणूक प्रकरण ! उद्योजक गौतम पाषाणकर, त्यांची मुलगी रीनल पाषाणकर यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला

Pravin Darekar | आसमानी संकटाने शेतकरी हवालदील, तरीही सरकारला प्रतीक्षा अहवालाची – प्रवीण दरेकर

 

Related Posts