IMPIMP

Prasad Oak | मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

by nagesh
Prasad Oak | marathi actor prasad oak wished cm eknath shinde on his birthday

सरकारसत्ता ऑनलाईन  –  मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळख असणारे अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आजवर प्रसादने त्याच्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर प्रसाद त्याच्या कामाबरोबरच कुटुंबियांबरोबरचे देखील अनेक फोटो शेअर करत असतो. प्रसाद ओक मागच्याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात प्रसादने आनंद दिघेंची भूमिका पडद्यावर उत्तमरीत्या साकारून प्रेक्षकांकडून कौतुक करून घेतले होते. आता प्रसादने (Prasad Oak) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद ओक नेहमी आपल्या कामाचे अपडेट चाहत्यांपर्यंत शेअर करत असतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!! ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…!!” सध्या प्रसादने शेअर केलेली ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

 

धर्मवीर या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले होते. तर धर्मवीर हा चित्रपट स्वर्गवासी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी आनंद दिघेंची भूमिका उत्तमरीत्या साकारली होती. तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.

 

प्रसादच्या (Prasad Oak) वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास प्रसाद आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून
प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.
तर लवकरच दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रसाद प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन
येत आहे. तो या चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत काम करणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Prasad Oak | marathi actor prasad oak wished cm eknath shinde on his birthday

 

हे देखील वाचा :

Pune News | रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी

Pune Crime News | पुण्यातील सराईत गुन्हेगार सौरभ पवार व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 12 वी कारवाई

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून

 

Related Posts