IMPIMP

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून

by nagesh
Kalyan Crime News | murder of railway police sub inspector incident in kalyan

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाईन – Kalyan Crime News | कल्याण परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. चौकशी (Inquiry) केल्याच्या रागातून आणि वेतनवाढ (Salary Increase) रोखल्याच्या रागातून रेल्वे सुरक्षा दलाच्या एका कॉन्स्टेबलने पोलीस उप निरीक्षकाचा खून (PSI Murder) केला. याप्रकरणी पोलीस कॉनस्टेबल याला पेण येथून अटक (Arrest) केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ (Kalyan Crime News) उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागातील सिद्धार्थ नगर येथील रेल्वे बॅरेकमध्ये ही घटना घडली आहे. बसवराज गरग (PSI Basavaraj Garg) असे खून झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर कॉन्स्टेबल पंकज यादव (Constable Pankaj Yadav) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. बसवराज गरग हे रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये (Railway Protection Force) उपनिरीक्षक पदावर कार्य़रत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात रोहाचा परिसर येतो. तर आरोपी पंकज यादव याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलीस ठाण्यांतर्गत (Pen RPF Police Station) येणाऱ्या रोहा येथे आहे. एका प्रकरणात पंकज यादव याची चौकशी करत कारवाई केल्याचा राग पंकजला होता. त्याने पगारवाढीची शिफारस करण्यासाठी गरग यांच्या परवानगीची गरज होती. मात्र, बसवराज गरग यांनी त्याची वेतनवाढ रोखली होती.

 

वेतनवाढ रोखल्याच्या रागातून बुधवारी रात्री पंकज याने गरग यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी होऊन गरग यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस (Kolshewadi Police Station)
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन संशयित आरोपी पंकज यादव याला
पेण येथून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोलशेवाडी पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Kalyan Crime News | murder of railway police sub inspector incident in kalyan

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

WTC Final 2023 | आयसीसीने दिली मोठी अपडेट; ‘या’ दिवशी खेळवला जाणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार

 

Related Posts