Prof. Sachin Jaibhai | केंद्रीय सल्लागार समितीच्या संचालकपदी पुण्यातील प्रा. सचिन जायभाये यांची निवड
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Prof. Sachin Jaibhai | भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय संचालित अन्न पुरवठा महामंडळाच्या केंद्रीय सल्लागार समितीवर संचालक म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य प्रा. सचिन जायभाये यांची निवड झाली आहे. राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी प्रा. जायभाये यांच्या नावाची शिफारस केली होती.
केन्द्रीय सचिव मदन मोहन मौर्य यांनी या निवडीचे पत्र दिले. ही निवड पुढील दोन वर्षांकरिता असणार आहे. डॉ. महात्मे व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या संधीतून चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न असेल (Prof. Sachin Jaibhai). ग्राहकांचे अन्न पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल, असा विश्वास प्रा. जायभाये यांनी व्यक्त केला.
Web Title : – Prof. Sachin Jaibhai Prof. Pune as Director of Central Advisory Committee Selection of Sachin Jaibhaye
Comments are closed.