IMPIMP

PSI And Police Personnel Suspended | विनयभंगाच्या गुन्ह्यात मदतीसाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी तडकाफडकी निलंबित

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन   PSI And Police Personnel Suspended | विनयभंगाच्या (Molestation Case) गुन्ह्यात मदत करण्यासाठी 30
हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 10 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारला. त्यानंतर उर्वरित 15 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना
(Accepting Bribe) बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस
कर्मचाऱ्याला औरंगाबाद लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Tap) सोमवारी (दि.5) सापळा रचून रंगेहात पकडले. लाच घेणाऱ्या
दोघांना बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (Beed SP Nand Kumar Thakur) यांनी तडकाफडकी निलंबित (Police Officer Suspended)
केले आहे. (PSI And Police Personnel Suspended)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलीस उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड PSI Raju Bhanudas Gaikwad (वय 53), पोलीस अंमलदार विकास सर्जेराव यमगर (Vikas Sarjerao Yamgar) असे निलंबित (Policemen Suspended) करण्यात आलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांच्यावर दाखल गुन्ह्यात मदत करून बी फायन पाठवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड व पोलीस अंमलदार विकास यमगर यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी तक्रारदार यांनी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. उर्वरित 15 हजार रुपयांची मागणी गायकवाड व यमगर यांनी केली. तक्रारदार यांनी औरंगाबाद एसीबीकडे याबाबत तक्रार केली. (PSI And Police Personnel Suspended)

औरंगाबाद युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्यावरील दाखल गुन्ह्यात मदत करून
बी फायन पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तसेच पहिला हफ्ता 10 हजार रुपये घेऊन उर्वरित रक्कम 15 हजार रुपये गायकवाड व यमगर यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी सापळा रचून दोघांना तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PSI And Police Personnel Suspended | bribery for cooperation in the offense of molestation police personnel hastily suspended beed crime news

 

हे देखील वाचा :

Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | ‘काँग्रेस नेतृत्वाने आता संन्यास घेऊन हिमालयात जावे’ – राधाकृष्ण विखे पाटील

Nana Patole On Gujarat Election Results | ‘भय, भ्रष्टाचार, भूक अशा गोष्टींचा वापर गुजरात निवडणुकीत झाला’; गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Pune Crime | पॅथॉलॉजी लॅब सुरू करून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

 

Related Posts