IMPIMP

Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | ‘काँग्रेस नेतृत्वाने आता संन्यास घेऊन हिमालयात जावे’ – राधाकृष्ण विखे पाटील

by nagesh
Maharashtra Politics | ncp majority in mahanand yet command is in the hands of radhakrishna vikhe

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा
निवडणुकीची (Gujarat Election Results) मतमोजणी सुरू आहे. गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दिसत आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांनी
काँग्रेसवर तोंडसुख घेणे सुरू केले आहे. गुजरात विकासाच्या मॉडेलला जनतेने मते दिली, गुजरात विकासाच्या मॉडेलवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास
दाखवला आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. तसेच त्यामुळे आता काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने संन्यास घेऊन हिमालयात जावे, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. (Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership)

 

गुजरातमध्ये आता काँग्रेस पक्षाचे (Congress) अस्तित्व संपले आहे. भाजप (BJP) आघाडीवर आहे. जनतेने भाजपच्या पारड्यात कौल टाकला आहे. त्यामुळे विखे पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे अभिनंदन केले. भाजपला गुजरातमध्ये 56 टक्के मतदान झाले आहे. हा देशाच्या इतिहासातील विक्रम असल्याचे विखे पाटील म्हणाले. गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली असली, तरी हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पिछाडीवर आहे. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, हिमाचलमध्ये काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व नव्हे, तर स्थानिक नेतृत्वाला पाहून काँग्रेसला मतदान केले गेले आहे. स्थानिक परिस्थितीवर आधारून काँग्रेसला हिमाचलमध्ये मतदान मिळाल्याचे विखे पाटील म्हणाले. (Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवसेनेच्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही जोरदार टीका केली.
संजय राऊतांच्या आरोपांना काय उत्तर देणार? ते बिनबुडाचे गाडगे आहे, असे विखे पाटील म्हणाले.
यापुढे भाजप आणि त्यांची आघाडीच महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असेही विखे पाटील म्हणाले.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | maharashtra minister radhakrishna vikhe patil criticism on congress for gujarat assembly election result

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पॅथॉलॉजी लॅब सुरू करून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

Nana Patole On Gujarat Election Results | ‘भय, भ्रष्टाचार, भूक अशा गोष्टींचा वापर गुजरात निवडणुकीत झाला’; गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde On Pen Urban Bank Scam | गोरगरिबांचे पैसे त्यांना परत करा; पेण अर्बन बँक घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश

Sangli Crime | सांगलीत डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

 

Related Posts