IMPIMP

Pune ACB Case | अ‍ॅन्टी करप्शनची पथके पुण्यातील ‘त्या’ 2 पोलिसांच्या मागावर

by nagesh
Pune ACB Case | Anti Corruption Bureau Pune Search Police Havaldar Jairam Narayan Sawalkar & Vinayak Ulga Mudholkar In Bribe Case Of Yerwada Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Case | लाच प्रकरणात गुन्हा दाखल (Pune Bribe Case) झाल्यानंतर येरवडा पोलिस स्टेशनमधून (Yerwada Police Station) गायब झालेल्या त्या दोन पोलिस हवालदारांच्या (Pune Police) मागावर अ‍ॅन्टी करप्शनची पथके असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, 20 हजाराच्या लाचेची मागणी करून 13 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Pune) पोलिस हवालदार राजेंद्र रामकृष्ण दिक्षीत (Police Havaldar Rajendra Ramakrishna Dixit) यांना रंगेहाथ पकडले आणि त्यांना अटक केली (Pune ACB Trap). मात्र, त्याचे सहकारी पोलिस हवालदार जयराम नारायण सावळकर (Police Havaldar Jairam Narayan Sawalkar) आणि पोलिस हवालदार विनायक उल्गा मुधोळकर (Police Havaldar Vinayak Ulga Mudholkar) हे गायब झाले आहेत. (Pune ACB Case)

अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री येरवडा पोलिस स्टेशन येथे लाच घेताना राजेंद्र दिक्षीत यांना रंगेहाथ पकडले होते (Pune Crime News). त्यांना अटक केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर (Pune Shivaji Nagar Court) करण्यात आले. न्यायालयाने पोलिस हवालदार दिक्षीत यांना दि. 16 जून 2023 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस हवालदार जयराम सावलकर आणि पोलिस हवालदार विनायक मुधोळकर हे ट्रॅप झाल्यापासून गायब झाल्याने त्यांचा अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe) यांनी दिली आहे. (Pune ACB Case)

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve-Kharade) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे,
पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar),
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकुंद आयाचित, पोलिस अंमलदार भूषण ठाकूर आणि
पोलिस अंमलदार पांडुरंग माळी यांच्या पथकाने पोलिस हवालदार दक्षित यांना 13 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी लाचेची मागणी केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Web Title : Pune ACB Case | Anti Corruption Bureau Pune Search Police Havaldar Jairam Narayan Sawalkar &
Vinayak Ulga Mudholkar In Bribe Case Of Yerwada Police Station

Related Posts