IMPIMP

Pune ACB Trap News | खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाख 50 हजाराची लाच ! सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदारासह खाजगी व्यक्तीला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

by nagesh
Pune ACB Trap News | Anti Corruption Bureau Arrest API Amol Prakash Korde Police Sagar Tukaram Shelke In Bribe Case Of 150000

पुणे (नितीन पाटील) – Pune ACB Trap News | खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल न करण्यासाठी 1 लाख 50 हजार रूपये खाजगी व्यक्तीमार्फत घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector (API), पोलिस अंमलदारासह खाजगी व्यक्तीला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने Anti Corruption Bureau Pune (Pune ACB) अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील (Pimpri Chinchwad Police) निगडी पोलिस स्टेशनमध्ये (Nigdi Police Station) कार्यरत असलेल्या एपीआय आणि पोलिसावर अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune ACB Trap News)

सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे (API Amol Prakash Korde), पोलिस अंमलदार सागर तुकाराम शेळके (Police Sagar Tukaram Shelke) आणि खाजगी व्यक्ती सुदेश शिवाजी नवले Sudesh Shivaji Navale (43, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) अशी अ‍ॅन्टी करप्शनने अटक केलेल्यांची नाव आहेत. (Pune ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी त्यांचे ओळखीचे इसमास हातऊसणे व बँकेमधुन कर्ज काढून पैसे दिले होते. सदरचे बँक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचेकडे ऊसणे दिलेल्या पैशाची मागणी केली असता, तक्रारदाराच्या ओळखीच्या व्यक्तीने तक्रारदार यांच्या विरुद्ध निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी API अमोल कोरडे यांचेकडे असल्याने तक्रारदार यांचेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एपीआय अमोल कोरडे, पोलीस शिपाई सागर शेळके व खाजगी इसम नवले यांनी 1,50,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे येथील अ‍ॅन्टी करप्शन येथे दिली होती. (Pune Bribe Case)

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक सपोनि कोरडे व पोशि शेळके यांच्यावतीने खाजगी इसम नवले यानी 1,50,000 रुपयांची लाच मागणी केली व नवले यानी केलेल्या लाच मागणीस कोरडे व शेळके यांनी दुजोरा देवून सहाय्य केले. लाच रक्कम नवले याने स्विकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pimpri Chinchwad ACB Trap Case)

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (DySP Shital Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale),
पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर (PI Pravin Nimbalkar), पोलिस हवालदार नवनाथ वाळके, पोलिस
अंमलदार सौरभ महाशब्दे, महिला पोलिस अंमलदार शिल्पा तुपे आणि चालक
पोलिस अंमलदार पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Pimpri Chinchwad Bribe Case News)

Web Title : Pune ACB Trap News | Anti Corruption Bureau Arrest API Amol Prakash Korde
Police Sagar Tukaram Shelke In Bribe Case Of 150000

Related Posts