IMPIMP

Pune Airport | 15 दिवसांनंतर पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू

by nagesh
Pune Lohegaon International Airport | After Sukhoi Tyre Burst Pune Airport Runway Closed For Some Hours

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Airport | जवळपास पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पुण्याहून (Pune Airport) विमानसेवा सुरू झाली आहे. लोहगाव विमानतळांवरून (lohegaon) आज (शनिवारी) सकाळी 8 वाजल्यापासून विमानांच्या उड्डाणास सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात 52 विमानांची उड्डाणे होणार आहेत. तर साधारण तेवढीच विमाने लोहगाव विमानतळावर दाखल होणार आहेत.

 

पंधरा दिवसानंतर उड्डाण सेवा सुरू झाल्या असल्या तरी तिकिटाचे दर वाढले आहेत. पुणे ते नागपूर तिकिटाचे दर 21 हजार रुपयांपर्यंत गेले आहे. दरम्यान, आजपासून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. तर, विमानतळ प्रशासनाने शनिवारपासूनच विंटर शेड्युलही (Winter schedule) लागू केला आहे. 15 दिवसांनंतर शनिवारपासून विमानसेवा सुरू होत असल्याने शुक्रवारी विमानतळावर गर्दी झाली होती. रात्री आठ वाजेपर्यंत विमांनाचे वेळापत्रक ठरले नव्हते. शनिवारपासून पुणे विमानतळाचा (Pune Airport) विंटर वेळापत्रक सुरू होत असल्याने त्याचे अतिरिक्त नियोजन करावे लागत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्यांच्या विमानांच्या संख्येत वाढ होत आहे.
विमानतळ प्रशासनाने हे अजुन जाहीर केले नाही, तरीही जयपूर, दिल्ली, बेंगळुरू,
हैदराबाद आदी शहरांना जाणाऱ्या विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Airport | pune international airport start from today

 

हे देखील वाचा :

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’ (व्हिडीओ)

Actress Shweta Tiwari | 40 व्या वर्षी आपल्याच मुलीवर हॉटनेसच्या बाबतीत श्वेताने केली मात, गोल्डन शॉर्ट ड्रेसमध्ये शेयर केले छायाचित्र

Pune News | पुण्यातील हडपसरमध्ये अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेची धडक कारवाई; 300 झोपड्या जमीनदोस्त

 

Related Posts