IMPIMP

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना पूल रात्री किंवा पहाटे पाडणार

by nagesh
Pune Chandani Chowk Bridge Demolition | The Chandni Chowk bridge will be demolished between October 1 and 2 at midnight

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना पूल 1 ऑक्टोबरला मध्यरात्री किंवा २ ऑक्टोबरला पहाटे पाडण्याचे ठरविण्यात आले आहे. या ठिकाणच्या वाहतुकीचा फ्लो पाहता हीच वेळ प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नॅशलन हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI), पूल पाडणारी कंपनी, वाहतूक पोलीस यांसह संबंधित यंत्रणांची बैठक मंगळवारी (२७ सप्टेंबर) होणार असून त्यानंतर पूल पाडण्याबाबतचे तपशील जाहीर केले जाणार आहेत. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चांदणी चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. पूल पाडल्यानंतर पर्यायी मार्गाने येथील वाहतूक वळविण्यात येणार आहे. पूल सकाळी पाडल्यास बघ्यांची गर्दी, येथील वाहूतक आणि नागरी भाग लक्षात घेता हा पूल रात्री पाडण्याचे निश्चित झाले आहे. १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री किंवा २ ऑक्टोबरला पहाटे पूल पाडण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी नियंत्रित स्फोट करण्यात येणार आहे. त्याकरिता या पूलाला यापूर्वीच छिद्रे पाडण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पूल पाडण्यासाठी आवश्यक स्फोटके शनिवारी पुण्यात दाखल होणार आहेत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

 

दरम्यान, चांदणी चौकातील कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एनएचएआयने या ठिकाणचा जुना पूल पाडण्याचे नियोजन केले आहे. हे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या दिल्लीतील कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार या कंपनीकडून पूल पाडण्याआधीची पूर्वतयारी करण्यात आली आहे. पूल पाडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरला पूल पाडण्याचे निश्चित झाले आहे.

 

‘पूल पाडण्यासाठी नियंत्रित स्फोट करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील निवासी भागातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागणार आहे.
तसेच पर्यायी वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय पूल पाडल्यानंतर पडणारा राडारोडा उचलण्यासाठी आवश्यक व्यवस्था,
ऐनवेळी येणाऱ्या समस्या यांचे निवारण करण्यासाठी एनएचएआय, पूल पाडणारी कंपनी, वाहतूक पोलीस यांची एकत्रित बैठक मंगळवारी बोलावण्यात आली आहे.
त्यामध्ये सर्वंकष नियोजन केले जाईल. पूल पाडण्यापूर्वी माध्यमांसह, समाजमाध्यमांतून व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल,
जेणेकरून या ठिकाणाहून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना त्रास होणार नाही.’

 

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी (Dr. Rajesh Deshmukh, Collector)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Chandani Chowk Bridge Demolition | The old bridge at Chandni Chowk will be demolished at night or early morning

 

हे देखील वाचा :

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

Khadakwasla Dam Pune | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला

Moto Vault | मोटो व्हॉल्टच्या पहिल्या शोरूमचे पुणे येथे उद्घाटन

Pune Crime | हैद्राबाद-पुणे प्रवासात महिलेशी अश्लिल वर्तन; बसचालकाला बंडगार्डन पोलिसांकडून अटक

 

Related Posts