IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is less than five hundred find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 45 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 6 हजार 006 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 96 हजार 083 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली
आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 45 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 85 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात
(Discharge) आले आहे.

 

 

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 36 लाख 51 हजार 511 जणांची कोरोना (Pune Corona) चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 06 हजार 006 जण
कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9096 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर
आजारांनी ग्रस्त होते. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 827 इतकी आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
सोमवारी (दि.22) 45 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 222 संशयितांची तपासणी करण्यात आली
आहे.
आज दिवसभरात 85 कोरोनामुक्त झाले आहेत तर आज शहरात एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहरामध्ये 98 गंभीर रुग्ण असून
ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 77 इतकी आहे.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 85 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Urfi Javed | उर्फीचा एअरपोर्ट लुक बघून चाहते ‘हैराण’, फोटो पाहून व्हाल थक्क !

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात एकाचा खून, दुसरा जखमी; प्रचंड खळबळ

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 43 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts