IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 116 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन–  पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update ) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रीय रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update ) 21 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 116 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 45 लाख 28 हजार 133 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 61 हजार 685 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update ) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 52 हजार 091 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची
(Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 246 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 04 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) आणि नाॅन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर
(Non-Invasive ventilator) एकही रुग्ण नाही. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 4.06 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

 

Web Title :- Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Tata Group TTML Share | कंगाल करणार्‍या टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेयरने 7 दिवसात गुंतवणुकदारांना दिला जबरदस्त रिटर्न

Amol Mitkari | ‘छत्रपतींनी करून ठेवलेल्या ‘त्या’ गोष्टींमुळे पोर्तुगीजांना…”; इतिहासाचा दाखला देत मिटकरींचं भाजपवर टीकास्त्र

Mumbai-Pune Highway | लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो-एन्ट्री’

 

Related Posts