IMPIMP

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! ‘कोरोना’च्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या पाचशेच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is less than five hundred find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोनाची (Pune Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 18 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 137 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 101 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 018 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 643 इतकी झाली आहे.
यापैकी 6 लाख 51 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 445 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 5 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर एक रुग्ण उपचार घेत आहे. तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर एकही रुग्ण नाही.
एकूण ॲक्टीव्ह रुग्णांपैकी 4.94 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is less than five hundred find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | HUF India कंपनीची व्यवस्थापकीय संचालकांकडून 139 कोटींची फसवणूक; सुनिल कुमार गर्ग, निखिल अगरवाल, संदिप वाण, विशाल टमोटीया यांच्यावर FIR

Hearing Loss | तुमची ऐकण्याची क्षमता प्रभावित करू शकतात ‘या’ 4 सवयी, जाणून घ्या उपाय

Sus-Mahalunge Water Issue | सूस म्हाळुंगे पाणी पुरवठा प्रश्नावर भाजपच्या अमोल बालवडकरांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

 

Related Posts