IMPIMP

Pune Crime | HUF India कंपनीची व्यवस्थापकीय संचालकांकडून 139 कोटींची फसवणूक; सुनिल कुमार गर्ग, निखिल अगरवाल, संदिप वाण, विशाल टमोटीया यांच्यावर FIR

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे / चाकण : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | खेड तालुक्यातील नाणेकरवाडी (Nanekarwadi Taluka Khed) येथील एचयूएफ इंडिया प्रा. लि. (HUF India Pvt. Ltd.) कंपनीची व्यवस्थापकीय संचालकांनी (Managing Director) तब्बल 139 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2010 ते मे 2020 या कालावधीत (Pune Crime) घडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुनिल कुमार गर्ग (Sunil Kumar Garg), निखिल अगरवाल (Nikhil Agarwal), संदिप वाणी (Sandeep Vani),
विशाल टमोटीया Vishal Tamotia (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकीय संचालकांची नावे आहेत.
याबाबत संदिप जगदीश चौधरी Sandeep Jagdish Chaudhary (वय – 45 रा. नाणेकरवाडी , ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यवस्थापकीय संचालक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कंपनीचे इतर संचालक व जर्मनी (Germany) येथील मुख्य कंपनी एचयूएफ हल्सबेक ॲण्ड फुर्स्ट जीएमबीएच अँड कंपनी केजी (HUF Hullsback & First GmbH & Co. KG), बेल्बर्ट (Belbert) यांना तसेच कंपनीचे पर्चेस हेड श्रीपाद कुलकर्णी (Purchase Head Shripad Kulkarni)
व त्यांच्या टीमला कोणतीही माहिती न देता खोट्या पर्चेस ऑर्डर तयार केल्या.
आरोपींनी खोट्या पर्चेस ऑर्डर द्वारे वेगवेगळ्या व्हेन्डरकडून (Vendor) खोटे इनव्हाईस (False Invoice) घेतले.
तसेच त्यावर एचयुएफ इंडिया कंपनीचे खोटे स्टॅम्प वापरुन माल कंपनीत न घेता त्याच्या खोट्या नोंदी केल्या आणि व्हेंडरला पैसे दिले.

 

याशिवाय वेगवेगळ्या एनजीओला (NGO) आवश्यकता नसताना देखील डोनेशन (Donation) व सीएसआरद्वारे (CSR) मोठ्या प्रमाणात रक्कम देऊन कंपनीची 139 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
ही रक्कम आरोपींनी वेगवेगळ्या मार्गाने स्वत:च्या व कुटुंबियांच्या नावे घेऊन कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 139 crore from managing directors of HUF India FIR against Sunil Kumar Garg Nikhil Agarwal Sandeep Van Vishal Tamotia

 

हे देखील वाचा :

Hearing Loss | तुमची ऐकण्याची क्षमता प्रभावित करू शकतात ‘या’ 4 सवयी, जाणून घ्या उपाय

Sus-Mahalunge Water Issue | सूस म्हाळुंगे पाणी पुरवठा प्रश्नावर भाजपच्या अमोल बालवडकरांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Blood Sugar | साधारण किती असायला हवी ब्लड शुगरची लेवल? वाढली असेल तर तात्काळ जाणून घ्या कमी करण्याचे ‘हे’ 5 उपाय

 

Related Posts