IMPIMP

Pune Corporation Elections | महापालिका निवडणूक 2022 ! प्रभाग रचना व आरक्षण सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ! आचारसंहिता 15 जानेवारीला?

by nagesh
PMC Pune Elections | Even after the announcement of ward formation program by the Election Commission, big changes in 'draft ward structure'!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे महापालिका निवडणूक २०२२ साठीची (Pune Corporation Elections) प्रभाग रचना व आरक्षण सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होउन १५ जानेवारीपर्यंत निवडणुकीची घोषणा होईल. तर निवडणूका फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. (Pune Corporation Elections)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील १० महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Pune Corporation Elections) दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश या महापालिकांना (Pune Corporation) दिले आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने कच्चा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडून (election commission) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरकती व सूचनांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करणे तसेच आरक्षण सोडत काढण्यासाठी आदेश मिळण्याची शक्यता आहे. हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर जानेवारीच्या मध्यावर निवडणूक (municipal elections) कार्यक्रम घोषित होईल. मतदान साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मतदान  न झाल्यास दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षांमुळे पुढे जाण्याची भितीही या अधिकार्‍याने व्यक्त केली आहे.

 

२०२२ पुणे महापालिकेचे असे असेल चित्र

 

२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या – ३५ लाख ५६ हजार ८२४.

 

एकूण सदस्य संख्या – १७३

महिला सदस्य संख्या – ८७

तीन सदस्यीय प्रभाग संख्या – ५७

द्विसदस्यीय प्रभाग संख्या – १

 

तीन सदस्यीय प्रभागातील मतदार संख्या. – सरासरी ६१ हजार ५८०. कमाल ६७ हजार ८४८. किमान ५५ हजार ५१२

 

द्विसदस्यीय प्रभागातील मतदार संख्या – सरासरी ६१ हजार ५८०. कमाल ४५ हजार २३२. किमान ३७ हजार ८.

 

अनुसूचित जातीची लोकसंख्या – ४ लाख ८० हजार १७. (सदस्य संख्या २३)

 

अनुसूचित जमातीची लोकसंख्या – ४१ हजार ५६१ (सदस्य संख्या २)

 

नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखून ठेवायच्या जागा – ४७ सदस्य.

 

Web Title : Pune Corporation Elections | Municipal Election 2022! Leaving ward formation and reservation may be in the first week of December! Code of Conduct on January 15?

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | MSRTC कडून कठोर कारवाई ! संप करणार्‍या 376 कामगारांचं निलंबन

Pune ST Workers Strike | पुण्यातील शिवाजीनगरच्या वाकडेवाडीत ST कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 43 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts