IMPIMP

Pune Corporation GB | तुकाई दर्शन येथील पाण्याच्या टाकीचे पाणी ‘महंमद वाडी’ला वळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – माजी महापौर वैशाली बनकर (व्हिडीओ)

by nagesh
Pune Corporation GB | Action should be taken against the officials who diverted water from Tukai Darshan to ‘Mohammad Wadi’ – Former Mayor Vaishali Bankar

पुणे: सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation GB | हडपसर (Hadapsar) येथील तुकाई दर्शन (Tukai Darshan) येथील पाण्याच्या टाकीतून महमंदवाडीला (Mohamadwadi) पाणी दिल्याने तुकाई दर्शन परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कुठलाही अभ्यास न करता परस्पर पाणी वळविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ,माजी महापौर वैशाली बनकर ( Former mayor Vaishali Bankar) यांनी आज सर्वसाधारण सभेत (Pune Corporation GB) केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सर्वसाधारण सभेत (Pune Corporation General Body Meeting) वैशाली बनकर बनकर म्हणाल्या तुकाई दर्शन येथे 2012 ला पाण्याची टाकी
उभारली होती. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. परंतु आता त्या ठिकाणी आणखी 18 इंची लाईन टाकून पाणी महंमद वाडीला
नेण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याची दखल आपण घ्यावी. प्रशासनाने कुठल्या अधिकारात हे पाणी
वळविले? प्रशासन (Pune Corporation GB) दिशाभूल करण्याचे काम करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई (Take Action On PMC Officers) करावी.

 

 

 

 

महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी याची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (pmc additional commissioner ravindra binwade) आणि पाणी पुरवठा अधीक्षक अनिरुद्ध पावसकर (PMC Water Supply Superintendent Aniruddha Pawaskar) यांनी उद्याच तुकाई टेकडी येथे जाऊन पाहणी करावी, व योग्य कारवाई करावी असे आदेश दिले.
यातून मार्ग न निघाल्यास मी स्वतः बैठक घेईल असे आश्वासनही मोहोळ यांनी यावेळी दिले.

 

Web Title: Pune Corporation GB | Action should be taken against the officials who diverted water from Tukai Darshan to ‘Mohammad Wadi’ – Former Mayor Vaishali Bankar

 

हे देखील वाचा :

Pune News | कुत्र्यांच्या नसबंदीच्या ‘ऑपरेशन’ थिएटरमध्ये उंदरांचा सुळसुळाट; बंदोबस्तासाठी ‘मांजरी’ पाळायच्या? (व्हिडीओ)

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाचा फोटो ‘व्हायरल’

7th Pay Commission | 7 दिवसानंतर 31% DA सह वेतन देणार मोदी सरकार; वाढतील 20484 रुपये, जाणून घ्या गणित

 

Related Posts