IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

by nagesh
Pune Corporation | There will be an 'evaluation' of the treatment of the officers and employees of the Pune Municipal Corporation with the public; 'Feedback form' in all offices!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Corporation | पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या घट झाल्याने नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी शहरामध्ये कडक निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे महापालिकेने (Pune Corporation) ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत मनपा हद्दीसाठी सुधारीत आदेश जारी केले आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी ब्रेक द चेन (Break The Chain) बाबतचे सुधारीत आदेश जारी केले असून या आदेशात शहरातील रेस्टॉरंट (Restaurants), बार (bar), दुकाने (shop) यांच्या वेळेत वाढ केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सुधारीत आदेश खालील प्रमाणे

1. पुणे महानगरपालिका (Pune Corporation) क्षेत्रातील सर्व व्यापारी दुकाने ही सर्व दिवस रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

2. पुणे महानगरपालिका (Pune Corporation) क्षेत्रातील सर्व रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सर्व दिवस रात्री 12.00 पर्यंत सुरु राहतील.

3. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अम्युझमेंट पार्क (Amusement Park), संग्राहलय (Museum) व इंडस्ट्रीज दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून सुरु राहतील. तसेच मोकळ्या जागेतील कोरड्या राईड्ससाठी (dry rides) परवानगी राही. मात्र यामध्ये पाण्यातील राईड्ससाठी सक्त मनाई राहील.

4. अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्याबाबत आरोग्य विभागाने 18 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेले आदेश, मार्गदर्शक सूचना लागू राहितील. तसेच आदेश आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल.

5. सुधारीत नियम महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी लागू राहतील.

6. हे नियम पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत.

कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 20055 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे, पुणे महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

 

Web Title : Pune Corporation | Pune Municipal Corporation issues revised orders regarding restaurant, bar, food court, shop hours; PMC Commissioner Vikram Kumar issue order today

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात लिलाव भिशीच्या नावाखाली महिलेची 60 लाखांची फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध FIR

Mumbai Crime | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटीच्या हिरोईनसह महिला तस्कर गजाआड

7th Pay Commission | दिवाळीसाठी 7000 रुपये वाढून येईल कर्मचार्‍यांचा पगार, मोदी सरकारने केली घोषणा

 

Related Posts