IMPIMP

Pune CP Amitesh Kumar | ‘रस्त्यावर महिलांची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळणार’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Video)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'त्या' गुन्हेगारांची यादी काढण्यात आली असून त्यांची धरपकड सुरु

by sachinsitapure
Pune CP Amitesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune CP Amitesh Kumar | रस्त्यावर घडणारे गुन्हे रोखणे ही आमची प्राथमिकता आहे. रस्त्यावर गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या तसेच सिग्नलवर झालेल्या वादातून रस्त्यावर मारहाण करणे, गाड्यांची तोडफोड करणरे, अशा प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पोलीस आयुक्तालयात ते पत्रकारांशी बोलत होते. (Pune CP Amitesh Kumar)

आयुक्त अमितेश कुमार पुढे म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांचे क्रिमीनल रेकॉर्ड आहे अशा गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. जे गुन्हेगार एमपीडीए मधून बाहेर आले असतील, गुन्ह्यात फरार आहेत, जामीनावर बाहेर आले आहेत, ज्यांच्यावर कारवाईचे आदेश निघाले असतील अशा गुन्हेगारांची यादी तयार करुन त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणावर कोण कोणत्या कायद्यांतर्गत पुढील दोन महिन्यात प्रतिबंधात्मक कारवाई करायची याची देखील लिस्ट तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. काही भागात पेट्रोलींग वाढवण्यात आली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ज्या काही उपाय योजना करायच्या आहेत त्या करण्यात येत आहेत.

अन्यथा कडक कारवाई करणार

शहरातील पब्स आणि रेस्टॉरंटला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, याचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना साडे अकरा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर खाद्य पदर्थ विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

दारुच्या दुकानाबाहेरील विक्रेत्यांवर कारवाई करणार

पुण्यात दारुच्या दुकानाबाहेर अंडा बुर्जी तसेच चायनीज गाड्यांवर दारुचे सेवन केले जात असल्याचे दिसून आले आहे. वाईन शॉपच्या समोर आणि आसपासच्या गाड्यांवर दारू पिणाऱ्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच देशी दारु विक्रीच्या दुकानांना सकाळी आठ ते रात्री दहा ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी वेळेच्या आधी आणि वेळ संपल्यानंतर देखील दुकाने सुरु ठेवली जात आहेत, अशा दुकानांवर देखील कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Related Posts