IMPIMP

Pune Crime | भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार; वडगाव शेरीमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | भांडण सोडवल्याच्या रागातून हातगाडीवर समोसा विक्री करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथे घडली आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल करून एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Crime) मंगळवारी (दि.6) रात्री साडेसातच्या सुमारास सोमनाथनगर, वडगाव शेरी येथे घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ओंकार गलांडे, सुगज बालाजी मदाळे (वय 19, रा. वडगाव शेरी) व त्यांचे इतर 5 साथीदारांवर चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) आयपीसी 307, 324, 323, 143, 144, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला असून, ओंकार गलांडे याला अटक केली आहे. याबाबत सुनील गोली निसाद (वय 25, रा. साई मंदिराजवळ, चंदननगर) याने बुधवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हा हातगाडीवर समोसा विक्री करतो.
30 नोव्हेंबर रोजी आरोपी आणि सुनील याचा मित्र दिनेश पासवान यांच्यात दिनेशच्या इडलीच्या हातगाडीवर
भांडण झाले होते. हे भांडण सुनील याने सोडवले होते.
याचा राग मनात धरून आरोपींनी मंगळवारी रात्री दुचाकीवर येऊन सुनील याला कोयत्याने व लाकडी
दांडक्याने मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले.
तसेच कोयते, लाकडी दांडके हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे (PSI Palve) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A young man is stabbed with a spear out of anger at having settled a quarrel; Incident in Vadgaon Sherry

 

हे देखील वाचा :

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या

New WhatsApp Feature-Meta | मेटाची नवी घोषणा व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना मिळणार हे नवीन फीचर

PSI And Police Personnel Suspended | विनयभंगाच्या गुन्ह्यात मदतीसाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी तडकाफडकी निलंबित

 

Related Posts