IMPIMP

Pune Crime | विनयभंगातील आरोपीला काही तासातच अटक केल्यानंतर न्यायालयाकडून 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

by nagesh
High Court | wife secret call after warning of husband is marital cruelty high court

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हिंजवडीमधील आरोपी समीर जाधवने (Accused Sameer Jadhav) एका महिलेचा घरी जाऊन तिच्या मुलांसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग (Molestation Case) केला होता. या प्रकरणी तत्काळ गुन्हा (FIR) दाखल करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (PSI Ravindra Mudal) यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याला अवघ्या 72 तासांत शिवाजी नगर कोर्टाकडून (Shivaji Nagar Court) 18 महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरोपी विरोधात मजबूत पुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (PSI Ravindra Mudal) यांनी दिली. यावेळी न्यायालयाचे कामकाज न्यायदंडाधिकारी श्रद्धा जी डोलारे (Magistrate Shraddha G. Dolare) यांनी पाहिले. दरम्यान, 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता पिडीत महिला घरी असताना आरोपी समीर जाधव याने मुलासमोर त्या महिलेचा विनयभंग केला होता. ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला होता. तर, पीडित महिलेने हिंजवडी पोलिसात (Hinjewadi Police) तक्रार दिल्यानंतर अवघ्या 36 तासांत आरोपी समीरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Pune Crime)

दरम्यान, यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करत सरकारी वकील विजयसिंह जाधव (Lawyer Vijay Singh Jadhav)
यांच्यातर्फे मजबूत पुरावे न्यायालयात सादर केले गेले.
दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे (Magistrate Shraddha G. Dolare)
यांनी आरोपी समीर जाधवला कलम 354 अन्वये 6 महिने,
कलम 452 अन्वये 6 महिने, कलम 506 अन्वये 6 महिने अशी सक्त मजुरीसह 9 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
तर, सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत (Senior PI Balkrishna Sawant)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (PSI Ravindra Mudal) यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | accused of molestation arrested in few hours sentenced to 18 months imprisonment shivaji nagar court pune

 

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे पुन्हा 5000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Railways | रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! 12 फेब्रुवारीपर्यंत ‘या’ गाड्या रद्द; जाणून घ्या

Deepika Padukone | शॉर्ट ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणनं लावली सोशल मीडियावर आग

 

Related Posts