IMPIMP

Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठेतील क्रांती चौकात (Kranti Chowk, Budhwar Peth) दोन गटात मोठी मारामारी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 13) मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे. यात दोन गटांत वाद सुरु असून, कोयत्याने मारामारी होत असल्याचे दिसत आहे. येथून शुक्रवार पेठ पोलीस ठाणे (Shukravar Peth Police Station) हाकेच्या अंतरावर आहे. तरी देखील अद्याप पोलिसांनी या घटनेची दखल घेतली नाही, अशी माहिती समोर येत आहे. (Pune Crime)

 

 

सीसीटीव्हीमध्ये काही तरुण कोयत्याने वार करताना दिसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने, एकच पळापळ झाली. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्राप्त माहितीनुसार, कॉलेजमध्ये शिकणारे दोन विद्यार्थी या वस्तीत रात्री आले होते.
यावेळी त्यांच्या गाडीचा समोरील टोळक्याच्या गाडीला थोडक्यात टकराव होता होता राहिला.
यावेळी त्यांनी त्यांना जाब विचारला असता, या टोळक्यातील एकाने कोयत्याचा धाक दाखवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्या दोन मुलांनी तेथून पळ काढला. पण त्यांच्या मागे जात त्यांनी त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
याची कोणतीही फिर्याद अद्याप पोलीस ठाण्यात दिली गेलेली नाही.
ही दोन मुले कॉलेज करणारी असल्याने त्यांनी आपल्याला पोलीस ‘तुम्ही इथे का आलात’, हा प्रश्न विचारतील या भितीने फिर्याद दिली नाही, असे दिसते. (Pune Crime)

 

बुधवार पेठेतील चार गल्ल्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. तसेच लोकांची वर्दळ असते.
त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी गुंडगिरी करण्याच्या प्रकारात काही टोळ्या अग्रेसर असतात.
त्यातूनच हा प्रकार घडला आहे. पण या ठिकाणी फरासखाना आणि शुक्रवार पेठ पोलीस ठाणे असूनही पोलीस नव्हते,
त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | budhwar peth ruckus caught on cctv

 

हे देखील वाचा :

Comedian Sunil Grover | सध्या ‘अशी’ आहे डॉ. गुलाटीची अवस्था; रस्त्याच्या कडेला शेंगदाणे विकतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

Sharad Pawar | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईवर शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

Ajit Pawar | “दारू पिता का? असं आपण विचारत नाही…”; अजित पवारांनी सत्तारांना सुनावले

 

Related Posts