IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सुतारदरा येथील कुख्यात कुणाल धर्मे टोळीतील 8 जणांवर ‘मोक्का’; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांची 66 वी MCOCA कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शरीराविरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच वेळोवेळी गुन्हे करणार्‍या सुतारदरा येथील कुख्यात कुणाल धर्मे (Gangster Kunal Dharme) याच्यासह त्याच्या टोळीतील 8 जणांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का (Mokka) कायद्याअंतर्गत (MCOCA Act) कारवाई केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत तब्बल 66 वेळा मोक्का अंतर्गत (Pune Crime) कारवाई केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कुणाल हेमंत धर्मे Kunal Hemant Dharme (21, रा. भुगाव, पौड), यशराज हनुमंत शिंदे Yashraj Hanumant Shinde (19, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), योगेश राम दबडे Yogesh Ram Dabade (21, रा. शिवणे), धीरज नथु कुडले Dhiraj Nathu Kudle (27, रा. सुतारदरा, कोथरूड), महेश शाम सातपुते Mahesh Sham Satpute (26, रा. सुतारदरा, कोथरूड), रोहित सुरेश सातपुते Rohit Suresh Satpute (26, रा. सुतारदरा), संतोष निवेकर Santosh Nivekar (रा. भुगाव, पौड) आणि तुषार पोकळे Tushar Pokale (रा. पुणे) यांच्यावर कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. आरोपींवर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील ते धजावत नसल्यामुळे तसेच त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Police Action Against Criminals)

 

 

कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap) यांनी आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई म्ळणून प्रस्ताव पाठविला होता. पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी तो प्रस्ताव अप्पर आयुक्त राजेद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी मोक्काअंतर्गत 8 जणांवर कारवाई केली आहे. आयुक्त गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी आतापर्यंत मोक्का कायद्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून आतापर्यंत 66 वेळा कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | ‘Mcoca’ on 8 members of the infamous Kunal Dharme gang at Sutardara in Pune; 66th MCOCA action of Police Commissioner IPS Amitabh Gupta

 

हे देखील वाचा :

Ranjitsinh Disale | शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘ग्लोबल टीचर’ डिसले यांना सवाल; म्हणाले – ‘तीन वर्षात शाळेसाठी काय केले?’

Woman Teacher Wins | ‘मोठ्या आवाजात’ ओरडणाऱ्या शिक्षककेला मिळाले करोडो रुपये, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Pune Crime | खळबळजनक ! दोन मित्र आमने-सामने; एकाने चालवले हत्यार, दुसऱ्याकडून 3 राऊंड फायर; एकजण जागीच ठार

 

Related Posts