IMPIMP

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक

by nagesh
 Pune Crime News | 16-year-old girl raped by blackmail in Mundhwa, 20-year-old youth arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | मुंढवा परिसरात राहणार्‍या 16 वर्षीय मुलीला वेळावेळी ब्लॅकमेल (Blackmail) करून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी 20 वर्षीय युवकाला अटक केली आहे. त्याच्याविरूध्द भादंवि 376, पोक्सो 4,8, 12 अन्वये मुंढवा पोलीस  ठाण्यात (Mundhwa Police Station) गुरनं 108/2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

युवराज चौगुले Yuvraj Chougule (20, रा. सर्व्हे नं. 69, सॅफरॉन हॉटेलच्या मागे, बि.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी युवराज चौगुले हा फिर्यादीच्या परिसरात रहावयास आहे. त्याने पिडीत मुलीला वारंवार त्रास दिला आणि त्यानंतर मैत्रिपुर्ण संबंध प्रस्थापित केले. मैत्रिबाबत आई-वडिलांना सांगेल, तुझा काटा काढेल अशी धमकी देवुन युवराज चौगुलेने पिडीत मुलीचा लैंगिक छळ केला आणि तिच्यावर अत्याचार केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी युवराज चौगुलेला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | 16-year-old girl raped by blackmail in Mundhwa, 20-year-old youth arrested

 

हे देखील वाचा :

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

Expressions 2023 | ‘एक्स्प्रेशन्स २०२३’ महोत्सवला चांगला प्रतिसाद; भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये यशस्वी आयोजन

Devendra Fadnavis | ‘…त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही’, विरोधकांच्या ‘त्या’ टिकेवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले – ‘परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी शांतता राखावी’ (व्हिडीओ)

 

Related Posts