IMPIMP

Pune Crime News | प्लॉट विक्रीमध्ये एकाची दोन कोटींची फसवणूक, दोघांवर FIR; येरवडा परिसरातील घटना

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मोकळा प्लॉट दाखवून दुसऱ्या प्लॉटची विक्री करुन दोन कोटींची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान मोहनवाडी, येरवडा येथे घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

इमरान मौला शेख Imran Maula Sheikh (रा. येरवडा), मन्सूर मकसूद कुरैशी Mansoor Maqsood Qureshi (रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मुकेश जगदीश गोयल Mukesh Jagdish Goyal (वय-51 रा. धानोरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शेख आणि कुरैशी यांच्यावर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मोहनवाडी येथील सिटी सर्व्हे नं. 2762/30 मधील प्लॉट नंबर
34 च्या शेजारी असलेल्या प्लॉट नं. 35 ची मोकळी जागा हीच प्लॉट नंबर 34 असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास
संपादन केला. तसेच 1 कोटी 95 लाख रुपये घेऊन त्यांना खरेदी खत करुन दिले. मात्र प्रत्याक्षात प्लॉट नंबर 34 वरती
मोती टॉवरची इमारत उभी आहे. आरोपींनी जो प्लट दाखवला त्याची विक्री न करता दुसऱ्या प्लॉटची विक्री करुन फिर्यादी
यांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला.
तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी शेख आणि कुरैशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (API Sonwane) करीत आहेत.

Related Posts