IMPIMP

Pune Crime News | दुचाकीला बुलेट घासल्याने भाईने तरुणावर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

by sachinsitapure
Attempt to kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मित्राच्या बुलेटवरुन जात असताना गुंडाच्या दुचाकीला बुलेट घासली. त्यामुळे गुंड शिवीगाळ करु लागला. तेव्हा सहप्रवासी असलेल्या तरुणाने शिव्या का देतो, असे विचारल्याने गुंडाने रागात तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या घटनेत गौरव संभाजी काकडे (वय ३१, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) हा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) राज मानवतकर (वय २०, रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण) व त्याच्या मित्रावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाषाण येथील सोमेश्वर मंदिराजवळील शिवशंभो हॉटेलसमोर बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव काकडे यांचा दुध व्यवसाय आहेत.
फिर्यादी हा त्याचा मित्र अजय सुरवसे याच्या बुलेटवरुन घरी जात होते. त्यावेळी शिवशंभो हॉटेलसमोर सुरवसे याची बुलेट राज मानवतकर याच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीला घासली. यावरुन राज मानवतकर व त्याचा मित्र जोरजोरात शिवीगाळ करु लागला. तेव्हा फिर्यादी याने त्याला शिव्या कशाला देतो, असे म्हटले. त्यावर राज मानवतकर याने मला ओळखतो का मी या एरियाचा भाई आहे. आता तुला दाखवतो, असे म्हणून कमरेचे धारदार शस्त्र काढले व आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून तो मारण्यास धावून आला. तेव्हा फिर्यादी घाबरुन पळू लागला. हे पाहून अजय सुरवसे घाबरुन बुलेट टाकून पळून गेला. पळताना फिर्यादी पडला. तेव्हा राज मानवतकर याने फिर्यादीच्या बरगडीत वार केला. (Pune Crime News)

फिर्यादी आरडाओरडा करु लागल्यावर लोक जमले. त्यांना पाहून राज याने कोणी पडले तर एकेकाचा काटा काढील,
अशी धमकी दिली. तेव्हा आजू बाजूचे लोक पळून गेले. काही वेळाने फिर्यादी याचा भाऊ शुभम याने फिर्यादीला रुग्णालयात
दाखल केले. फिर्यादी औंधमधील एम्स हॉस्पिटलमध्ये (AIIMS Hospital Aundh) उपचार घेत असून पोलिसांनी
हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली. खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन राज मानवतकर याला अटक
केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonwane) तपास करीत आहेत.

 

Related Posts