IMPIMP

Pune Traffic Police | पुणे वाहतूक पोलिसांकडून चलनाच्या दंडातील सवलतीबाबतच्या माहितीसाठी ‘हेल्पडेस्क’

by sachinsitapure
Violation of Traffic Rules

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Traffic Police | वाहतूक नियमांचं उल्लंघन (Violation of Traffic Rules) करणाऱ्या लोकांवर दंड आकारला जातो. यात ओव्हर स्पीड असो किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, सिग्नल तोडणे इत्यादी नियमांचं उल्लंघन केल्यानंतर दंड आकारण्यात येतो. वाहतूक पोलिसांकडून दंडाचे चलन (Traffic Fine Challan) मोबाईलवर पाठवून त्यानंतर दंडाची रक्कम वसुल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. मात्र, अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असून ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे (District Legal Services Authority, Pune) यांच्या वतीने येरवडा येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात (DCP Traffic Office Yerwada) 9 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे (Lok Adalat In Pune) आयोजन करण्यात आले आहे. (Pune Traffic Police)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलीस उपायुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.24) वाहतुक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Judicial Magistrate), मोटार वाहन न्यायालय (Motor Vehicle Court) यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये 28 ऑगस्ट पासून येरवडा वाहतूक कार्यालयात (Yerwada Traffic Office) प्रलंबित वाहतूक चलनांचे तडजोडीनंतर दंडातील सवलतीबाबतच्या माहितीचा हेल्पडेस्क (Helpdesk) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Traffic Police)

यामध्ये वाहतूक चलनांचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी नागरिकांच्या वाहनांवरील दंडाच्या रक्कमेत
तडजोडीअंती सूट दिली जाणार आहे. ज्या वाहनांवर प्रलंबित केसेस आहेत, अशा वाहन चालक,
मालक यांनी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत येरवडा येथील पोलीस उपायुक्त कार्यायात
उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहन चालकांवरील प्रलंबित दंडाची रक्कम तडजोडीनंतर वाहन चालकांवरील
दंड चलन कमी केले जाईल.

पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik)
यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना ‘जिल्हा हेल्प डेस्क’ ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Traffic DCP Vijaykumar Magar) यांनी दिली.

Related Posts