IMPIMP

Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; 58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त

by sachinsitapure
Anti Narcotics Cell

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने (Anti Narcotics Cell) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 58 लाख 57 हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन (Mephedrone (MD) आणि हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. ही कारवाई (Pune Crime News) शुक्रवारी (दि.24) केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

गोपीचंद रामलाल बिश्नोई Gopichand Ramlal Bishnoi (वय 28 रा. रामदेव फर्निचर मरकळ रोड चऱ्होली, पुणे मूळ रा. पुनासा भिनमाल, जिल्हा जालोर, राज्य राजस्थान-Rajasthan) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन (Viman Nagar Police Station) येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) कलम 8(क), 21(क), 22(क), प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार पुणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे (Yogesh Mandhare) यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती लोहगाव येथील रामचंद्र काळे नगर येथील सार्वजनिक रोडवर मेफेड्रॉन व हेरॉईन हे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकून आरोपी गोपीचंद बिश्नोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 58 लाख 57 हजार 200 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 10 लाख 77 हजार 200 रुपये किमतीचे 53 ग्रॅम 860 मिली ग्रॅम मेफेड्रोन, 46 लाख 89 हजार रुपये किमतीचे 312 ग्रॅम 60 मिलिग्रॅम हेरॉईन, 80 हजार रुपये किमतीची दुचाकी, 11 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte), पोलीस उपनिरीक्षक एस.डी. नरके (PSI S.D. Narke),
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan) पोलीस अमलदार योगेश मांढरे, महेश साळुंखे, शिवाजी घुले,
चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, सय्यद साहिल शेख, नितीन जगदाळे, अजीम शेख, संदीप शेळके, संतोष देशपांडे,
संदीप जाधव दिशा खेवलकर व दिनेश बाष्ठेवाड यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts