नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Crime News | पत्रकार असल्याची बतावणी (Journalist) करुन अवैध धंद्याची बातमी न टाकण्यासाठी 50 हजार रुपये गुडलक व दरमहा 20 हजार रुपये मागणाऱ्या कथित पत्रकारावर वाशी पोलीस ठाण्यात (Vashi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Navi Mumbai Crime News) या कथित पत्रकारावर यापूर्वी देखील फसवणुकीचे (Fraud) गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. डीसीपी (DCP), एसीपी (ACP), सीपी (CP) कोणीही असो, माझ्यासमोर येण्याची पोलिसांची (Mumbai Police) ताकद नाही अशी धमकी देऊन पैसे मागितले जात होते. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी रविवारी या कथित पत्रकारावर कारवाई केली. (Maharashtra Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
एकनाथ शिवराम अडसूळ Eknath Shivram Adsul (वय-47 रा. खारघर) असे गुन्हा दाखल केलेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे. तो वाशी येथील एका व्यक्तीला खंडणीसाठी (Extortion Case) धमकी देत होता. या व्यक्तीच्या घरात जुगाराचा अड्डा (Gambling Den) चालून असल्याचा आरोप होता. त्यामुळे त्याच्या विरोधात बातमी न छापण्यासाठी तसेच पोलिसांकडे तक्रार न करण्यसाठी तो गुडविल स्वरुपात 50 हजार तर महिना 20 हजारांची मागणी करत होता. तडजोड करुन गुडविल 30 तर महिना 10 हजार रुपये देण्याचे तक्रारदार यांनी मान्य केले. दरम्यान, कथित पत्रकार एकनाथ अडसूळ याचे संभाषण तक्रारदार यांनी रेकॉर्ड करुन पोलिसांना देऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सपाळा रचून त्याच्यावर कारवाई केली. (Maharashtra Crime News)
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तक्रारदार आणि एकनाथ अडसूळ यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग समोर आले आहे.
यामध्ये अडसूळ हा संबंधित व्यक्तीवर त्याची छाप पाडण्यासाठी आपला पेपर लय डेंजर आहे.
माझ्यासमोर यायची कोणाची ताकद नाही. डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो… असे वक्तव्य करत असल्याचे समोर
आले आहे. तसेच आपल्याला खंडणी दिल्यानंतर मांडवली झाली असं पोलिसांना सांगून पुन्हा धंदा सुरु करायचा
असा सल्लाही तो देत असल्याचे दिसत आहे. त्याद्वारे तक्रारदार याचा खरचं अवैध धंदा होता का? याची
चौकशी वाशी पोलीस करीत आहेत.