IMPIMP

ACB Trap On Police Officer | लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API) व पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

by sachinsitapure
Abhona Police Station

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) अभोणा पोलीस ठाण्यातील (Abhona Police Station) सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector (API) आणि पोलीस शिपाई (Police Constable) यांना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap On Police Officer) सापळा रचून रंगेहात पकडले. एपीआय नितीन जगन्नाथ शिंदे API Nitin Jagannath Shinde (वय-39) व पोलीस शिपाई कुमार गोविंद जाधव Kumar Govind Jadhav (वय-42) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई अभोणा पोलीस ठाण्यात केली. (ACB Trap On Police Officer)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली आहे.
तक्रारदार यांच्या विरोधात अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज (Complaint Application) दाखल करण्यात आला आहे. या तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे व पोलीस शिपाई कुमार जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक एसीबीकडे तक्रार केली. (ACB Trap On Police Officer)

नाशिक एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता एपीआय शिंदे व पोलीस शिपाई जाधव यांनी तक्रारदार
यांच्या विरोधाती तक्रार अर्जाच्या चौकशीत गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी करुन तडजोडी अंती दहा हजार
रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अभोणा पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
दोघांविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts