IMPIMP

Pune Crime News | सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षाच्या युवतीची रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | A 17-year-old girl commits suicide by jumping off the train due to her stepmother’s trouble

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | दहा वर्षापूर्वी स्टोव्हचा भडका होऊन महिलेचा मृत्यु झाला. त्यानंतर आता त्याच महिलेच्या 17 वर्षाच्या मुलीने सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून रेल्वेमधून उडी मारुन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

अश्विनी तुकाराम चव्हाण Ashwini Tukaram Chavan (वय 17, रा. नानाईनगर, येरवडा – Nanainagar Yerwada) असे या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) तिचे वडिल नामदेव तुकाराम चव्हाण (Namdev Tukaram Chavan) आणि सावत्र आई लक्ष्मी नामदेव चव्हाण Lakshmi Namdev Chavan (दोघे रा. नानाईनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत युवतीचा मामा शंकर गेग्या राठोड (वय 42, रा. धानोरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण सीमा हिचा 2005 मध्ये नामदेव चव्हाण याच्याशी विवाह झाला. त्यांना राज व अश्विनी (वय 17) आणि सचिन (वय 13) अशी तीन अपत्य आहेत. नामदेव याच्या छळाला कंटाळून 2013 मध्ये लक्ष्मी हिने पेटवून घेऊन आत्महत्या (Pune Suicide News) केली. स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना रॉकेलचा भडका उडला. असे सांगण्यात आले. त्यानंतर मुलांच्या पालनपोषणासाठी नामदेव याने सहा महिन्याच्या आत लक्ष्मी हिच्याबरोबर विवाह केला. लक्ष्मी ही तिन्ही मुलांना मारहाण (Beating) करणे, घरातील कामे करायला लावणे, जेवण न देणे, बाहेर मोलमजुरी करा व पैसे आणून द्या असे सांगून छळ करीत होती. (Pune Crime News)

तीन वर्षांपूर्वी मोठा मुलगा राज याची शाळा बंद करुन किराणा दुकानात कामाला लावले.
त्याच्या पैशांवर घराचा खर्च चालतो.
त्यानंतर मे 2022 मध्ये अश्विनी हिची शाळा बंद करुन तिला वडगाव शेरी येथे एका घरात बाळाला संभाळण्यासाठी ठेवले.
ती तेथेच रहात असे. नामदेव दर महिन्याला येऊन कामाचे पैसे घेऊन जात असे. एप्रिल महिन्यात अश्विनी हिने काम सोडले.
त्यामुळे तिच्या सावत्र आईने तिला मारहाण करुन चटके दिले होते. तिने हा प्रकार फिर्यादी मामा याला सांगितले.
त्याने नामदेव याला समजावून सांगितल्यावर अश्विनीला त्याच्याबरोबर पाठविले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

त्यानंतर तिच्या सावत्र आईच्या बहिणीचे लग्न असल्याने मामाने तिला कपड्यांसाठी दीड हजार रुपये दिले. गुलबर्गा येथून लग्नावरुन 3 जून रोजी मुंबई एलटीटी सुपर फास्ट एक्सप्रेस (Mumbai LTT Super Fast Express) मधून ते परत येत होते. त्यावेळी दौंड रेल्वे स्टेशन (Daund Railway Station) सुटल्यानंतर काही वेळाने पाटस ते कडेठाण रेल्वे स्टेशनच्या दरम्यान अश्विनी हिने चालत्या रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केली. दौंड रेल्वे पोलिसांनी (Daud Railway Police) गुन्हा दाखल करुन तो अधिक तपासासाठी येरवडा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Web Title : Pune Crime News | A 17-year-old girl commits suicide by jumping off the train due to
her stepmother’s trouble

Related Posts