IMPIMP

Pune Crime News | मैत्रिणीनेच मैत्रिणीला घातला 69 लाखांचा गंडा ! काका पोलीस असल्याचे सांगून धमकाविले, पोलिस कर्मचार्‍यासह 6 जणांवर फसवणूकीचा गुन्हा

by nagesh
FIR

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन– Pune Crime News | एका मैत्रिणीने दुसर्‍या मैत्रिणीला अडचणीत असल्याचे सांगून स्वत:च्या नावावर कर्ज (Loan)
काढायला लावले. त्या कर्जाचे काही हप्ते दिल्यानंतर हप्ते न भरता तब्बल ६९ लाखांची फसवणूक (Cheating Case) केली आहे. पिडित मैत्रिणीला दर
महिन्याला १ लाख ७० हजार रुपयांचा हप्ता भरावा लागत आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने पिडित मैत्रिणीकडे गेली. तेव्हा तिने आपला काका पोलीस (Pune
Police) आहे, तो तुला पाहून घेईन अशी धमकी दिली. ती आईवडिल, बहिणीकडे दाद मागण्यासाठी गेली. तेव्हा आईवडिलांनी तिला मारहाण केली तर
बहिणीने संपवून टाकण्याची धमकी दिली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका ३९ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८५/२३) दिली आहे. त्यानुसार
पोलिसांनी शशीकांत वसंत लोणकर Shashikant Vasant Lonkar (वय ५६ (रा. राजस सोसायटी, कात्रज), सुशिल वसंत लोणकर Sushil Vasant
Lonkar (रा. स्वारगेट पोलिस लाईन), उत्तम शेळके Uttam Shelke (रा. फ्लॅट नं. 5, आम्रपाली सोसायटी, सिंहगड रोड) यांच्यासह 3 महिलांवर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी महिलेची एक मैत्रिण असून त्या दोघी एकाच सोसायटीमध्ये रहायच्या. फिर्यादीच्या मैत्रिणीने फिर्यादीला माझे
वैवाहिक जीवन संपुष्टात येत आहे. मी खुप अडचणीत येत आहे. मला तातडीने ५० ते ६० लाखांची गरज असून मला आर्थिक मदत कर.
माझ्या नावावर इतके कर्ज मिळणार नाही. मी कजार्चा हप्ता नियमित भरत जाईल. पिडीतेने सुरवातीला इतके कर्ज मिळणे शक्य नसल्याचे सांगीतले होते. मात्र कल्याणीने उत्तम शेळके हा नॅशनल बॅकांचा सेलींग एजंट असल्याचे सांगितले. उत्तम शेळके याने त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन एकाचवेळी अनेक बँकांमधून फिर्यादी यांच्या नावावर तब्बल ८० लाखाचे कर्ज काढले. यातील ४८ लाख ४ हजार रुपये फिर्यादीच्या मैत्रिणीने फेडले.
उरलेले पैसे देत नसल्याने पिडीतेचे हप्ते थकत गेले. फिर्यादीने राहिलेले पैसे परत मागितले असता त्यांना धमकाविण्यात आले. फिर्यादीच्या मैत्रिणीने तिला माझा काका  सुशिल लोणकर हा समर्थ पोलीस ठाण्यात पोलीस आहे. त्यांना तुझे नाव सांगेन, अशी धमकी दिली.

 

त्यानंतर फिर्यादी यांनी सुशिल लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तू तिला दिलेले पैसे विसरुन जा.
तुला काय कायदेशीर कारवाई करायचे आहे, ती कर असे उत्तर दिले.
त्यानंतर फिर्यादी या तिच्या आईवडिलांच्या घरी गेल्या.
तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना खाली पाडून केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तू जर परत आमच्या दारात आली तर माझा भाऊ सुशिल लोणकर हा समर्थ पोलीस ठाण्यात पोलीस आहे.
त्याला तुझे नाव सांगून तुला असे जेरीस आणतो की तुला सुद्धा कळणार नाही, असा तुझा काटा काढतो,
अशी धमकी देऊन त्यांना हाकलून दिले. तिच्या बहिणीनेही फिर्यादी यांना धमकावले.
पोलिसांनी त्यांची तक्रार न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल (FIR As Per Court Order) केला असून
पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hiwarkar) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | A friend cheated a friend of 69 lakhs! Threatened by saying uncle is policeman, 6 persons including policeman charged with fraud

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – परिचारिकेच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

Pune Crime News | सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! पालघन घेऊन पसरत होते दहशत, सराईत गुंडांसह 5 जणांना अटक

 

Related Posts