Pune Crime News | तरुणाला अर्धनग्न करुन बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांवर FIR; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बदनामी करत असल्याच्या संशयावरून तरुणाला शिवीगाळ करत अर्धनग्न (Half Naked) करुन बेदम मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. तसेच या मारहाणीचा व्हिडीओ पीडित तरुणाच्या ओळखीच्या लोकांना पाठवला. याप्रकरणी पीडित तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) रविवारी (दि.20) फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
राहुल व्यवहारे (Rahul Vyavahare) व शिवशंकर कडू (Shivshankar Kadu) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 323, 500, 504. 506 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 14 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मीनारायण मंदिराजवळ घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल आणि शिवशंकर यांना फिर्यादी हा आपली
बदनामी (Defamation) करतो असा संशय होता.
याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांना अर्धनग्न करुन मारहाण केली.
तसेच यापुढे इव्हेन्ट करायचा नाही असे सांगून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली.
आरोपींनी अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो फिर्यादीच्या क्षेत्रातील लोकांना
व्हॉट्सअॅपवर पाठवला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीशकुमार दिघावकर (PI Girish Kumar Dighavkar) करत आहेत.
- धक्कादायक! पुण्यात पोलीस पतीला सुट्टी न मिळाल्याने पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ
- घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
- अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक, 1 कोटी 16 लाखांचे अफीम जप्त
- ऑनलाइन तीनपत्ती खेळण्यासाठी घरफोडी करणारा चतु:श्रृंगी पोलिसांकडून गजाआड, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त
Comments are closed.