IMPIMP

Pune Crime News | ऑनलाइन तीनपत्ती खेळण्यासाठी घरफोडी करणारा चतु:श्रृंगी पोलिसांकडून गजाआड, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

by sachinsitapure
Pune Crime News | Man Arrested For Stealing Gold And Cash To Play 'Online Teen Patti' Game

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरफोडी (Burglary) करणाऱ्या आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 27 लाख 50 हजार रुपयांचे 55 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जप्त केले आहेत. आरोपीने ऑनलाईन तीन पत्ती खेळण्यासाठी (Online Teen Patti Game) घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घरफोडीचा प्रकार (Pune Crime News) 18 ऑगस्ट रोजी औंध (Aundh) परिसरात घडला होता.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मनीष जीवनलाल राय Manish Jeevanlal Rai (वय-29 रा. आऊट हाऊस, कोहिनुर प्लॅनेट, सांगवी रोड, पुणे मुळ रा. गाव खमतारा, ता. बडवारा, जि. कटणी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्र्यंबकराव तुळशीराम पाटील Trimbakrao Tulshiram Patil (वय-75 रा. स्पायरस शाळेजवळ, सांगवी रोड, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पाटील यांचा फटिलायझर निर्मितीचा व्यवसाय (Fertilizer Business) असून त्यांनी त्यांच्या बंगल्यातून 11 लाख रुपये रोख रक्कम व 55 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 38 लाख 50 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. (Pune Crime News)

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करुन तपास करुन मनिष राय याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कस्टडी (Police Custody) घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान मनिष राय याला मोबाईल फोनवर ऑनलाईन तीनपत्ती खेळण्याचा नाद असून त्याने पैसे हरल्याने चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 11 लाख रुपये ऑनलाईन तीन पत्ती खेळात हरल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता त्याने 11 लाख रुपये ऑनलाईन तीनपत्ती खेळात हरल्याचे त्याच्या बँक स्टेटमेंट वरून निष्पन्न झाले. आरोपीकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 27 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 55 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे
(ACP Aarti Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior PI Balaji Pandhre),
पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman), पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर
(PI Jagannath Jankar), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके
(PSI Rupesh Chalke), पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग,
बाबा दांगडे, श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, आशिष निमसे, सुधीर माने, प्रदीप खरात, सुधिर अहिवळे, विशाल शिर्के,
तेजस चोपडे यांच्या पथकाने केली.

Related Posts