IMPIMP

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक, 1 कोटी 16 लाखांचे अफीम जप्त

by sachinsitapure
Pune Crime News | Pune Crime branch arrests 3 drug smugglers, seizes opium worth 1 crore 16 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या (Pune Crime News) आरोपींकडून 1 कोटी 16 लाख 74 हजार रुपये किंमतीचा अफीम (Opium) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सुमेर जयरामजी बिष्णोई (वय-50 रा. कात्रज-कोंडवा रोड, कोंढवा बुद्रुक, मुळ रा. तहसील बावडी, जि. जोधपुर, राजस्थान-Rajasthan), चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई 17 ऑगस्ट रोजी गोकुळनगर येथील लेन नंबर एक येथील कात्रज-कोंढवा रोडवर (Katraj-Kondhwa Road) केली. (Pune Crime News)

गुन्हे शाखेकडील अंमली पदार्थ विरोधी पथक एक चे पोलीस अधिकारी कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना माहिती मिळाली की, कात्रज-कोंढवा रोडवरील स्नेहदत्त बिल्डींगजवळ एक व्यक्ती अफिम या अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त केले. त्याच्याकडून 64 लाख 49 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला.

आरोपीची पोलीस कस्टडीमध्ये चौकशी केली असता अफिम हा अंमली पदार्थ त्याचे दोन साथीदार चावंडसिंग राजपूत व लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करुन ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडून 52 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 52 लाख 4 हजार रुपयांचे 2 किलो 602 ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Senior PI Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle),
शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलीस अंमलदार पांडुरंग पवार, सचिन माळवे, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे,
मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, संदीप शिर्के, संदेश काकडे,
नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

Related Posts