IMPIMP

Pune Crime News | गोल्डन अवरमध्ये केली तक्रार सायबर फसवणुकीतील सर्व पैसे सुरक्षित

by sachinsitapure
Cyber Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | एका नोकरदाराचा सायबर चोरट्यांनी (Cyber Thief) आय डी व पासवर्ड घेऊन त्यांच्या ई व्हायलेटमधून (E Violet) पैसे काढून घेतले होते. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने संबंधित कंपनीने सर्व पैसे गोठविले. त्यामुळे सायबर चोरट्यांना हाती केवळ दीड हजार रुपये लागले. गोल्डन अवरमध्ये तक्रार केल्याने फसवणुक (Cheating Case) झाल्यानंतरही पैसे परत मिळविणे शक्य झाले. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत एका खासगी कंपनीत नोकरी करणार्‍या नोकरदाराने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तक्रार केली होती. सायबर चोरट्यांनी तक्रारदार यांना फोन केला होता. आपण कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तक्रारदार यांच्या मोबीविकच्या ई वॉलेटचा आयडी व पासवर्ड काढून घेतला होता. त्यानंतर त्यांच्या ई वॉलेटमधील ६० हजार रुपये काढून घेतले होते. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस शिपाई शेलार यांनी हे लक्षात घेऊन तातडीने कंपनीला ई मेल करुन तक्रार केली. तसेच फोन करुन माहिती दिली. सायबर चोरट्यांनी त्यांच्या ई वॉलेटमधून काढलेल्या ६० हजार रुपयांपैकी दीड हजार रुपये दुसरीकडे वळविले होते.ते वगळता उरलेले ५८ हजार ५०० रुपये कंपनीने तातडीने गोठवले व ते पुन्हा तक्रारदार यांच्या ई वॉलेटमध्ये वळते केले. कंपनीचे तसे पत्र पोलिसांना नुकतेच प्राप्त झाले आहे. (Pune Crime News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonwane),
पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Police Inspector Sandeep Bhosale), संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शेलार यांनी ही कामगिरी केली.

Related Posts