IMPIMP

Pune Crime News | दरोडे व जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा म्होरक्या गजाआड, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी (व्हिडिओ)

by nagesh
Pune Crime News | Gang leader arrested for robbery and forced theft, performance of Pune Rural Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मागील काही महिन्यांपासून पुणे ग्रामीण (Pune Rural) व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) दुर्गम भागात व एकांटी वस्तीमध्ये दरोड्यांचे (Robbery) व जबरी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch (LCB) पथकाने टोळीच्या म्होरक्याला अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 18 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी 17 लाख 64 हजार रुपयांचे 294 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त (Gold Jewellery Seized) केले आहेत. (Pune Crime News)
PLAY

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजय उल्हास्या काळे (रा. कडुस ता. पारनेर, जि. अहमदनगर), गणेश सुरेश भोसले (वय-28 रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि. बीड. सध्या रा. निघोज, ता. पारनेर) पावल्या उर्फ देवा कैलास काळे, तुषार उर्फ विशाल कैलास काळे, शरद कैलास काळे, सराफ व्यावसायिक किरण भाऊसाहेब बेद्रे (वय-33 रा. मु.पो. वाळुंज, ता. नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

दरोडे व जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे 6 ते 7 पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीरामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अजय उल्हास्य काळे (रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक केली होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून गणेश सुरेश भोसले याचे नाव पोलिसांना समजले. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे गुन्ह्यातील 8 ग्रॅम सोन्याचे दागिने, चोरलेली दुचाकी, घड्याळ, ब्रेसलेट असा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी गणेश भोसले याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने दरोडे, जबरी चोरी व घरफोडी करुन चोरलेले दागिने सराफ व्यावसायिक किरण भाऊसाहेब बेद्रे याला विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी बेद्रे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 17 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 294 ग्रॅम (30 तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

आरोपींकडून उघडकीस आलेले गुन्हे

आळेफाटा पोलीस स्टेशन (Alephata Police Station), शिक्रापुर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) -5 गुन्हे, शिरुर पोलीस स्टेशन (Shirur Police Station) – 4 गुन्हे, रांजणगाव पोलीस स्टेशन (Ranjangaon Police Station) -3 गुन्हे, नारायणगाव पोलीस स्टेशन (Narayangaon Police Station), दौंड पोलीस स्टेशन- 2 गुन्हे (Daund Police Station), बेलवंडी पोलीस स्टेशन (Belwandi Police Station), पारनेर पोलीस स्टेशन (Parner Police Station) मधील 18 गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे करीत आहेत.

ही कामगिरी पुणे ग्रमीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे
(Addl SP Mitesh Ghatte) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर
(LCB PI Avinash Shilimkar), सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare), महादेव शेलार
(API Mahadev Shelar), पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, प्रदिप चौधरी, शिवाजी ननवरे,
सहायक फौजदार तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे,
राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ,
योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापकीर,
दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर, रामदास बाबर, निलेश शिंदे,
चंद्रकांत जाधव, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, पोलीस नाईक बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवेले, मंगेश भगत, सहायक फौजदार काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, पोलीस कॉन्स्टेबल दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर (PI Pramod Kshirsagar), सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे (API Nitin Atkare), निखील रावडे, श्रीमंत होनमाने यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Gang leader arrested for robbery and forced theft, performance of Pune Rural Police

Related Posts