IMPIMP

Pune Crime News | पुण्यातून अपहरण झालेल्या तरुणाची गुजरातमधून सुटका, पुणे पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Kidnapped from Pune released from Gujarat, Pune police arrest three including woman

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | वादातून एका तरुणाचे पुण्यातील एनडीए रस्त्यावरील (NDA Road) कोंढवे धावडे परिसरतातून मोटारीतून अपहरण (Kidnapping) करण्यात आले होते. अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर 24 तासात पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Pune Police) एका महिलेसह तिघांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही घटना (Pune Crime News) 22 जून रोजी घडली होती.

याप्रकरणी एका महिलेसह प्रथमेश राजेंद्र यादव Prathamesh Rajendra Yadav (वय 21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव ता. खटाव, जि. सातारा), अक्षय मारुती कोळी Akshay Maruti Koli (वय 26, रा. पुसेगाव गोरेवस्ती, ता.खटाव, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली. दिलीप गोरख पवार Dilip Gorakh Pawar (वय 23, रा. कोंढवे धावडे) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दिलीप पवार याच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

दिलीप पवार आणि फिर्यादी हे जुळे भाऊ आहेत. दिलीप याचे कोंढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या साथीदारांनी अपहरण केले. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता आरोपी गुजरात राज्यातील (Gujarat State) वापी परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर उत्तमनगर पोलीस ठाण्यातील सहयक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar) आणि पोलीस कर्मचारी यांचे पथक तात्काळ वापी येथे रवाना करण्यात आले. पथकाने वापी येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून दिलीप याची सुटका करुन महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान गुन्ह्यात मदत करणाऱ्यांची नावे पोलिसांना समजली. पोलिसांनी पुसेगाव येथून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने तीन आरोपींना 28 जून पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (Sr PI Kiran Balwadkar),
पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख (PI Shabnam Shaikh) सुचनेनुसार तपास अधिकारी
सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokde),
पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane), पोलीस अंमलदार तानाजी नांगरे, किरण देशमुख, विनोद शिंदे, हजारे, केंद्रे,
गायकवाड, हुवाळे, तोडकर, पवार, पाडाळे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Kidnapped from Pune released from Gujarat, Pune police arrest three including woman

Related Posts