IMPIMP

MP Sanjay Raut | ‘…मग कळेल कुणाचा पोपट उडतोय!’, संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut slams devendra fadnavis bjp on election results

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप (BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक काल पुण्यात पार पडली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. पोपट मेला आहे, पण उद्धव ठाकरेंना हे कुणी सांगत नाही, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. या टीकेला ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ताबडतोब निवडणुका घ्या. कुणाचा पोपट उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे कळेल असे म्हणत संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) फडणवीसांना थेट आव्हान दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’च्या (Lok Maze Sangati) नव्या आवृत्तीत केलेल्या टीकेचा उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, शरद पवारांच्या पुस्तकात देवेंद्र फडणवीसांवरही काही वाक्य आहेत. तीही त्यांनी वाचून दाखवायला हवी होती. खिल्ली कशावर उडवायला हवी? काल त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. झोपलेल्या लोकांसमोर बोललेत ना ते. त्यांचे मोठे नेते झोपले होते, काही जांभया देत होते. अशा मेलेल्या कार्यकर्त्यांसमोर हे आमची खिल्ली उडवतात, पाहू ना, असा टोला त्यांनी लगावला.

पोपट मेलाच आहे, पण…

घटनाबाह्य सरकारचा पोपट मेलाच आहे. पण त्या पोपटाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न हे पुन्हा बेकायदेशीरपणे करत आहेत. आम्हाला विधानसभा अध्यक्षांविषयी (Assembly Speaker) अत्यंत आदर आहे. ते घटनात्मक पदावर बसले आहेत. पण शेवटी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती राजकीयच असतात. इथे धोका असतो. हे पद खुप महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्ष महात्मा आहेत, त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे, अशी खोचक टीका राऊतांनी केली.

पोपट कुणाचा उडतोय आणि…

राऊत पुढे म्हणाले, पोपट कुणाचा उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे कळेल त्यांना.
कृषी उत्पन्न बाजार समितीत (Krushi Utpanna Bazar Samiti) जे चित्र दिसलं ही फक्त झांकी आहे.
ताबडतोब निवडणुका घ्या, मग कुणाचा पोपट मेलाय, हे ताबडतोब जनता दाखवेल तुम्हाला, असं आव्हानच संजय राऊतांनी फडणवीसांना दिलं आहे.

डोकं ठिकाणावर आहे का?

या देशात 36 राज्य आहेत त्यापैकी 16 चा आकडा काय घेऊन सांगताय? किती नावं घेऊ? यांचं डोकं ठिकाणावर
आहे का? तुमच्याकडे काय आहे? एक गुजरात आणि उत्तर प्रदेश. बाकी काय आहे तुमच्याकडे?
तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं राज्य हिमाचल प्रदेश तुम्ही जिंकू शकला नाहीत, असाही टोला संजय राऊतांनी लगावला.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : MP Sanjay Raut | sanjay raut slams devendra fadnavis bjp on election results

Related Posts