IMPIMP

Pune Crime News | महिलेच्या फेसबुक कॉलला भुलला; तोतया सायबर पोलिसांनी लुटले

by sachinsitapure
Pune Crime News | Missed Woman's Facebook Call; The cyber police robbed the impersonator

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | फेसबुक अकाऊंटवरुन (Facebook Account) महिलेने कॉल करुन त्याला बोलावून घेतले. महिलेच्या या कॉलला भुलून तो पुण्यात आला. तेव्हा तोतया सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मुलींना ट्रॅप करतो, अशी धमकी देऊन त्याला लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत रावेत येथील एका ४६ वर्षाच्या गृहस्थाने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फेसबुक अकाऊंटधारक महिला व दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेल (Swarna Hotel Warje Malwadi) येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या फेसबुक अकाऊंटवर मनिषा जी असे सांगणार्‍या महिलेने
संपर्क साधला. त्यांना या महिलेने फेसबुक कॉल करुन वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेलमध्ये बोलावून घेतले.
त्याप्रमाणे फिर्यादी तेथे गेले. तेव्हा मनिषा जी या महिलेऐवजी दोघे जण त्यांच्याजवळ आले.
आम्ही सायबर पोलीस असून तू मुलींना ट्रॅप करतो, त्यांचे व्हिडिओ काढतो, हे आम्हाला चेक करायचे आहे, आमच्याबरोबर चौकीला चल असे म्हणून त्यांना वारजे माळवाडी येथील एच डी एफसी बँकेच्या एटीएममध्ये आणले. तेथे त्यांना ५३ हजार ५०० रुपये काढायला भाग पाडले. हे पैसे घेऊन दोघे पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक ओलेकर (Assistant Police Inspector Olekar) तपास करीत आहेत.

Related Posts