IMPIMP

Pune Crime News | कुख्यात गजा मारणे टोळीतील पप्पु कुडलेने दिली हात कापून टाकण्याची धमकी; येरवडयाच्या गुंजन चौकातील घटना

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असताना झालेल्या ओळखीतून एकाने गजा मारणे टोळीतील (Gajanan Marne Gang) पप्पु कुडले याच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्याबद्दल २१ लाख रुपये परत केल्यानंतरही अजून २० लाख रुपये व्याज दिले नाही तर आम्ही तुझे हात कापू, अशी धमकी कुख्यात गुन्हेगार पप्पु कुडले याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी सांगवीतील एका ३८ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अतुल ऊर्फ पप्पु कुडले Atul alias Pappu Kudle (रा. दत्तवाडी – Dattawadi), बांदल, बालाजी ऊर्फ भैय्या कदम (Balaji aka Bhaiyya Kadam) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ५ जानेवारी २०२३ रोजी येरवड्यातील गुंजन चौकात घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फसवणुकीच्या गुन्ह्यात फिर्यादीला अटक झाली होती. त्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. तेथे गजा मारणे टोळीतील गुन्हेगार पप्पु कुडले याच्याशी त्याची २ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी हे सर्व जण गजा मारणे टोळीतील गुन्हेगार आहेत. निलेश घायवळ टोळीतील (Nilesh Ghaiwal Gang) गुंड अमोल बधे (Gangster Amol Badhe) याचा खून (Murder) केल्याप्रकरणी गजा मारणे सह पप्पु कुडले, मंदार बांदल (Mandar Bandal) अशा २२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या खटल्यातून फेबुवारी २०२१ मध्ये सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली होती.

 

त्याअगोदर ते येरवडा कारागृहात होते. फिर्यादीने कारागृहातून सुटल्यानंतर कुडले याच्याकडून १० लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात फिर्यादीने २१ लाख रुपये परत दिले होते.
तरीही तो आणखी २० लाख रुपयांचे व्याज देण्याची मागणी करीत होता.
फिर्यादी व त्यांचे मित्र हे गाडीतून जात असताना ५ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता त्या टोळीने त्यांना
गुंजन चौकात (Gunjan Chowk, Yerwada) अडवले.
त्यांना व मित्रांना हाताने मारहाण करुन जबरदस्तीने गाडीत बसवले.
फिर्यादी यांच्या खिशातील ८२ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांना गाडीतून खाली उतरवून तू जर मला व्याजाचे पैसे दिले नाही तर आम्ही तुझा हात कापू,
अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून
येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pappu Kudle of the notorious Gaja Marne gang threatens to chop off his hand; Incident at Gunjan Chowk, Yerwadya

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | मुंबईतील भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी

Pune Crime | पोलीस शिपायाचा परस्पर कारनामा; लोहमार्ग उपअधीक्षकाच्या नावाने परस्पर मागितले सीसीटीव्ही फुटेज

Devendra Fadnavis | योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘उद्योगाला आकृष्ट करण्यासाठी मुंबईत…’ (व्हिडिओ)

 

Related Posts