IMPIMP

Pune Crime News | पीएमपीतील महिला वाहकाचा विनयभंग, पीएमपी चालकाला अटक

by sachinsitapure
Pune Crime News | PMP woman driver molested, PMP driver arrested By Bund Garden Police पीएमपीतील महिला वाहकाचा विनयभंग

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पीएमपीतील (PMP) महिला वाहकाचा चालकाने विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाला बंडगार्डन पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सुनिल कोंडीबा भालेकर Sunil Kondiba Bhalekar (वय 43, रा. सरकारवाडा, कान्हूर पठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक (Arrest) केलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत महिला वाहकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारात (Pune Railway Station) वाहक म्हणून काम करतात. तर आरोपी भालेकर तिच्या ओळखीचा आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून आरोपी सुनील भालेकर हा फिर्यादी यांच्यासोबत असभ्य वर्तन करत होता. तू मला खूप आवडते. माझ्या प्रेमाचा स्विकार कर, असे सांगून त्याने फिर्यादी यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी त्याला झिडकारल्याने भालेकर याने तिला शिवीगाळ करुन धमकावले. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे (API Madhale) तपास करत आहेत.

 

Web Title : Pune Crime News | PMP woman driver molested, PMP driver arrested By Bund Garden Police

Related Posts