IMPIMP

Pune Crime News | दांडेकर पुल परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडाची नागपूर कारागृहात रवानगी; CP रितेशकुमार यांनी केली MPDA ची कारवाई

by nagesh
Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s 28th MPDA action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | जनता वसाहत (Janata Vasahat), दांडेकर पुल (Dandekar Pool) परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारावर (Criminal On Pune Police Record) पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

समीर राहुल हतांगळे Sameer Rahul Hatangle (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पुल) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा आदेश रितेशकुमार यांनी काढला आहे.

समीर हतांगळे हा सराईत गुन्हेगार आहे.
त्याने साथीदारांसह दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) परिसरात लोखंडी रॉड,
धारदार हत्यारांसह खूनाचा प्रयत्न (Attempted Murder),
बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

मागील ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाहीत.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे
(Senior Police Inspector Jairam Paigude) व पीसीबीच्या
(Pune Police Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत २८ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

Web Title : Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s 28th MPDA action

Related Posts