IMPIMP

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-2 कडून माजी नगरसेवक महेबुब पानसरे खून प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असणार्‍या दोघांना डेक्कन परिसरातून अटक (Video)

by nagesh
Pune Police Crime Branch News | Two Arrest In Mehboob Pansare Murder Case Jejuri

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-2 च्या Anti Extortion Cell Pune (AEC Pune) पथकाने जेजुरी (Jejuri) येथील माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे खून (Mehboob Pansare Murder Case) प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असणार्‍या दोघांना डेक्कन (Deccan Pune) परिसरातून अटक केली आहे. याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांनी दिली आहे. (Pune Police Crime Branch News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वनीस प्रल्हाद परदेशी Vanis Prahlad Pardeshi (रा. 404, गुरूवार पेठ, पुणे. मुळ रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे) आणि महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेशी Mahadev Vitthal Gurav Alias Kaka Pardesi (65, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे. मुळ रा. मु.पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, जेजुरी येथील माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे (रा. जेजुरी) हे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पानसरे यांचा जमीनीच्या वादातून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेंदवस्ती येथे डोक्यात कुर्‍हाड आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. यावेळी साजिद युनुस मुलाणी Sajid Yunus Mulani आणि राजु फिरोज पानसरे Raju Firoz Pansare (दोघे रा. जेजुरी रेल्वे स्टेशनजवळ, ता. पुरंदर, जि. पुणे) हे जखमी झाले होते. (Pune Police Crime Branch News)

याप्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये (Jejuri Police Station) वणेश प्रल्हाद परदेशी (Vanesh Prahlad Pardeshi), किरण वणेश परदेशी (Kiran Vanesh Pardeshi), स्वामी वणेश परदेशी (Swami Vanesh Pardeshi), काका परदेशी आणि इतर एकाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या आदेशानुसार पुणे शहरात गुन्हे शाखेतर्फे कॉम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation), गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग, नाकाबंदी, सराईत गुन्हेगारांची चेकिंगची मोहिम कारवाई सुरू करण्यात आली होती.

शनिवारी (दि. 8) सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांना पानसरे खुन प्रकरणातील आरोपी वनीस परदेशी आणि महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेशी हे दोघे डेक्कन परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (PI Pratap Mankar), पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे (Police Surendra Jagdale), ईश्वर आंधळे (Police Ishwar Andhale), सचिन अहिवळे (Police Sachin Ahiwale), शंकर संपते (Police Shankar Sampate), सैदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून डेक्कन परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली.

खंडणी विरोधी पथक-2 च्या पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदारांनी वनीस परदेशी आणि काका परदेशी यांच्या डेक्कन परिसरातून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करण्यात आला असता ते दोघेही महेबुब पानसरे यांच्या खुनाच्या गुन्हयात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी इतर साथीदारांसह पानसरे यांचा खुन केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलातील जेजुरी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर,
पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे,
शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदिप गाडे आणि पवन भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Police Crime Branch News | Two Arrest In Mehboob Pansare Murder Case Jejuri

Related Posts