IMPIMP

Pune Crime News | पुणे पोलिसांकडून बनावट निकाहनामा बनवून तरूणीची बदनामी करणार्‍याला बुलढाण्यातून अटक

by nagesh
Pune Police Crime Branch News | Crime Branch arrested two mobile phone grabbers, minors are in custody

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बनावट निकाहनामा (Fake Nikahnama) बनवुन तरूणीची बदनामी केल्या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एकाला बुलढाण्यातून (Buldhana) अटक केली आहे. शेख खलील शेख जमील Shaikh Khalil Shaikh Jamil (30, रा. अमदापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या 9 महिन्यांपासुन आरोपी शेख खलील शेख जमील हा फरार होता. त्याने तरूणीच्या नावाने बोगस निकाहनामा बनविला होता. बोगस निकाहनामा खरा असल्याचे भासवुन तो तरूणीची बदनामी करीत होता. याप्रकरणी चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. तेव्हापासुन आरोपी हा फरार होता. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंदनगर पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. तो काही काळ छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) आणि जालना (Jalna) परिसरात वास्तव्यास होता. राहण्याचे ठिकाणी आणि मोबाईल नंबर (Mobile Number) तो साखरे बदलत होता. दरम्यान, आरोपी शेख हा बुलढाण्यातील चिखली (Chikhali Buldhana) भागात रहावयास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केली.

 

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहाय्यक आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Rajendra Landge), पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar), पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके (PSI Goraksha Ghodke) , नामदेव गडदरे, सचिन रणदिवे आणि संतोष लवटे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Chandan Nagar Police arrests a youth who defamed a girl by making a fake nikahnama from Buldhana

 

हे देखील वाचा :

Pune Mahavitaran News | महावितरणच्या उत्कृष्ट 56 जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव ! सेवेचा समृद्ध वारसा जोपासण्याचे ध्येय ठेवा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

NCP Chief Sharad Pawar | मला विचार करायला 2-3 दिवस द्या, शरद पवारांनी पाठविला कार्यकर्त्यांना निरोप; 1 अटही…

Ajit Pawar On TDM Marathi Movie | हे दुर्देवी, टीडीएमला लवकरात लवकर… दिग्दर्शक भाऊरावांच्या मदतीसाठी खुद्द अजित पवार आले पुढे

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार’ (Video)

 

Related Posts