IMPIMP

MP Sanjay Raut | ‘देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते, तर…’, संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय?

by nagesh
MP Sanjay Raut | ncp leader ajit pawar said dont speak about ncp sanjay raut reacts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) नुकताच आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना जी अराजक परिस्थिती निर्माण झाली. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. त्याला सरकारचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा (CM Resignation) मागितला पाहिजे. राज्यात 14 निरपराध लोकांचे बळी गेले. मात्र, सरकारकडून साधी संवेदनाही व्यक्त होत नाही. हे दुर्दैवी आहे, अशी टीका संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) केली.

 

…तर फडणवीसांनी धुडगूस घातला असता
देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते तर त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात (Navi Mumbai Police Commissionerate) जाऊन धुडगूस घातला असता. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करुनच ते बाहेर पडले असते, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) कमी पडतायत? असं म्हणायचं आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. फडणवीस आता गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी जुन्या फडणवीसांना जागवून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

 

दरम्यानं, अजित पवार आणि संजय राऊत यांच्या सामना रंगला आहे. अजित पवारांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) चौकीदार आहे, माझ्यावर खापर फोडण्याचं कारण काय? शिवसेना  (Shivsena) फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. शरद पवार (Sharad Pawar) काय म्हणतता, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | ncp leader ajit pawar said dont speak about ncp sanjay raut reacts

 

हे देखील वाचा :

Salokha Yojana Maharashtra | मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे – प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही…’ अजित पवारांचा उल्लेख करत संजय शिरसाटांची टीका

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत

Nana Patole | श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

 

Related Posts