IMPIMP

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही…’ अजित पवारांचा उल्लेख करत संजय शिरसाटांची टीका

by nagesh
Sanjay Shirsat On Sanjay Raut | mla sanjay shirsat on ajit pawar and sanjay raut dispute joining bjp mahaviksas aghadi uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Shirsat On Sanjay Raut | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीनाट्यवरुन मागील चार दिवस महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Political News) ढवळून निघाले होते. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत खुलासा करत आपण राष्ट्रवादी (NCP) सोडणार नसल्याचा खुलासा केला. यावेळी त्यांनी आमचे वकील पत्र घेण्याचा कुणी प्रयत्न करु नये असे म्हणत संजय राऊतांना (MP Sanjay Raut) सुनावलं होतं. यानंतर राऊतांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देताना आपण कुणाच्या बापाला घाबरत नसल्याचे म्हटले होते. यावरुन शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही घाबरत नव्हता, असे संजय शिरसाट म्हणाले. (Sanjay Shirsat On Sanjay Raut)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत यांनी बोलताना भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘ऑपरेशन लोटस’ (Operation Lotus) मी उधळून लावलं, असे म्हटले होते. राऊतांच्या या विधानाला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊतांना केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहन करु शकतात, अजित पवार त्यांना सहन करुन घेणार नाहीत, असे शिरसाट म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Sanjay Shirsat On Sanjay Raut)

 

संजय राऊतांना टोला लगावताना संजय शिरसाट पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे, ते अत्यंत बरोबर आहे. संजय राऊत हे स्वत:च्या बापालाही घाबरत नव्हता. संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) बुडवण्याचं काम पूर्ण केलं आहे. त्यातही उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) बुडवण्याच कामही त्यांनी केलं. आता संजय राऊतांनी अजित पवारांशी पंगा घेतला आहे. उद्धव ठाकरे हेच राऊतांना सहन करु शकतात. पण अजित पवार सहन करणार नाहीत. अजित पवार राऊतांना तातडीने योग्य ते प्रत्युत्तर देतील, अशी अपेक्षा असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.

 

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, ऑपरेशन लोटसबाबत मी लिहिलेलं सत्य कोणाला बोचत असेल तर त्याला मी काय करु. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. खरं बोलल्यामुळे कोणी मला लक्ष्य करत असेल तर मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलत आणि लिहीत राहणार. माझ्या विश्वसनीयतेवर शंका उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. फक्त शरद पवार यांनी माझ्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित केली तर मी त्याची दखल घेईन. मी फक्त शरद पवार (Sharad Pawar) यांचे ऐकेन, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Shirsat On Sanjay Raut | mla sanjay shirsat on ajit pawar and sanjay raut dispute joining bjp mahaviksas aghadi uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Salokha Yojana Maharashtra | मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे – प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत

Nana Patole | श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

Congress Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप; काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले – ‘प्रभू श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याच बरोबर’

 

Related Posts